शाहु वसाहत येथील खुनातील फरार आरोपीस अटक,
Murderer arrested:शाहु वसाहत येथील खुनातील फरार आरोपीस अटक,

Murderer arrested: पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : काही दिवसापुर्वीच शाहु वसाहत येथील बालाजी ट्रेडर्सच्या बाहेर
रात्रीच्या वेळेस अमित सरोदे वय (२१ वर्षे, रा.जनता वसाहत पुणे )या तरुणावर दोन लोकांनी पिस्टलने फायर करुन कोयत्याने वार करुन त्याचा खुन केला होता.
त्या दोन लोकांना काही तासातच दत्तवाडी पोलीसांनी अटक केली होती.
त्यांची नावे आदर्श मधुकर ननावरे व बोंबल्या ऊर्फ अभिषेक संजय काळे (रा.दांडेकर पुल)
या दोघांना अटक केल्यानंतर यशवंत पंढरीनाथ कांबळे(रा.वडगाव धायरी, पुणे )
याच्या सांगण्यावरुन त्यांनी वरिल मुलाचा खुन केला असल्याचे तपासात सांगितले .
चोरी करणारे गुन्हेगार अखेर वानवडी पोलीसांच्या ताब्यात,
मुलीच्या प्रेम प्रकरणातुन हा खुन झाल्याने यामध्ये अजुन कोण कोण सहभागी आहे याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे हे करत असताना ,
आदर्श ननावरे याला अमित नामदेव ढावरे (वय २६ वर्षे, रा.दांडेकर पुल पुणे )याने देशी बनावटीचे पिस्टल पुरविल्याचे कळाले.
त्याचा तपास केला असता तो वडगाव धायरी येथे भाडयाने फ्लॅट घेवुन राहत असल्याचे पोलिसांना समजले.
त्या भागातील सर्व सोसायटयांमध्ये माहिती काढुन अमित ढावरेला पोलीसांनी पकडले व त्याला न्यायालया समक्ष हजर केले,
सरकारी अभियोक्ता सुरेखा क्षिरसागर यांनी बाजु मांडली असता त्यास ३ दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली .
डिवटीवर दारु पिणा-या पुणे मनपाच्या सुरक्षा अधिका-याला कोविड योद्धा चे प्रमाण पत्र देण्याची मागणी

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Samarth Police Station)खबर्या करतोस का असे म्हणत नाना पेठेत मारहाण