पार्किंगच्या नावाने वकिल महिलेला खंडणी मागणारे पोलिसांच्या ताब्यात


🖕 Click Here

(Police arrested criminal) सराईत गुन्हेगार युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून जेरबंद

(Police arrested criminal) क्राईम ब्रांच न्यूज :

पुणे : अँड सिमिन अहमद शेख या त्यांच्या दुचाकीवर अशियाना अर्पामेंट पुना कॉलेजसमोर भवानी पेठ पुणे येथे ,

त्यांच्या मालकीच्या असलेल्या झेरॉक्स दुकानामध्ये कोर्टाच्या कामाचे झेरॉक्स प्रती काढण्यासाठी जात असतात सदर सोसायटी बाहेर पार्किंग आहे.

Advertisement

१४ ऑक्टोबर रोजी सदर पार्किंगमध्ये अँड महिला दुचाकी लावुन झेरॉक्स काढुन परत आल्या असता

सनी म्हेत्रे नावाच्या इसमाने गाडी पार्किंग करण्याचे पैसे ‘ मागितले त्यावेळी आमचे स्वतःचे झेरॉक्सचे दुकान आहे मी दिवसातुन ३ ते ४ वेळा दुकानात येते मी हे रोज कोण कोणला सांगु असे म्हणुन जात असताना बॅरेकेट लावुन अॅड महिलेची गाडी अडवुन

” तेरी कोणसी दुकान है मुझे बता हमको पैसे दो नहीं तो तुम्हारी गाडी फोड दुगां,

Advertisement

नही तो तुमको भी नहीं छोडुंगा ” म्हणुन आरोपी सनी म्हेत्रे , सागर बग्गन , नितीन , सय्यद अफसर इब्राहिम यांनी दमदाटी केली ,

याबाबत अँड सिमिन अहमद शेख यांनी आरोपी विरोधात लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या संदर्भात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Advertisement

त्या गुन्हाचे नोंदनी  क्रमांक १३२/२०२१ असून आरोपींवर भादवि कलम ३८५ , ३४१ , २८३ , २ ९ ०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

तेव्हा पासून आरोपी हे फरार होते.

१६ ऑक्टोबर रोजी युनिट १ , गुन्हे शाखा पुणे शहर यांच्याकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट -१ च्या हद्दीत पेट्रोलिंग करिता असताना

Advertisement

पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत पाहिजे असलेले आरोपी नामे

सनी म्हेत्रे व सागर बग्गन हे पुना कॉलेज गेट समोर भवानी पेठ पुणे येथे येणार आहे .

अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून त्यांच्या परवानगीने युनिट १ , गुन्हे शाखा पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन

🖕 Click Here
Advertisement

‘ नमुद आरोपींना ताब्यात घेवुन नावे पत्ते विचारता त्यांनी त्यांची नाव सनी ऊर्फ दशरथ श्याम म्हेत्रे (वय ३२ वर्षे रा . ४०४ भवानी पेठ पुणे)  

सागर राजु बग्गन (वय ३३ वर्षे रा . नक्षत्र बंगालो खंडोबामाळ मोझे वस्ती लोहगाव पुणे) असे असल्याचे सांगितले .

लष्कर पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबुल केल्याने आरोपीस पुढील कारवाई साठी लष्कर पोलीस स्टेशन , पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे .

Advertisement

सदर आरोपीवर अंमली पदार्थ तस्करी , जबरी चोरी , मारामारी असे एकुण ४ गुन्हे दाखल आहेत .

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे ,

पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्रीनिवास घाडगे ,

Advertisement

सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे – १/२ लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदशनाखाली

युनिट -१ , गुन्हे शाखा पुणे शहरचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे ,

पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , पोलीस अंमलदार अमोल पवार ,

Advertisement

अजय थोरात , महेश बामगुडे , तुषार माळवदकर यांनी केली असल्याची माहिती मिळाली. 

वाचा : अविनाश भोसले , विनोद गोयंका , विकास ओबेराय यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisement
🖕 Click Here