रामटेकडी आनंदनगर भागात एकावर जीवघेणा हल्ला; ३ जणांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

संगम महेश ठाकुर हा तरुण गंभिर जखमी.

Hadapsar: काल बुधवारी रात्री ९:३० वाजता सबेरा हॉटेल शेजारी आनंदनगर, रामटेकडी येथे मोटार सायकल पार्क केल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून, संगम ठाकुर यास आरोपींनी आपसात संगणमत करुन संगम याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कारखान्यामध्ये जबरदस्तीने ओढुन नेले,

धारदार हत्याराने त्याच्या छातीवर, उजवे बरगडीवर, मानेवर, डावे बरगडीवर व पाठीवर वार करुन, त्याला गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

video see 🖕

तसेच फिर्यादी हे भांडणे सोडण्यासाठी मध्ये गेलो असता, त्यांनाही उजवे डोळ्याचे भुवईवर व टोकदार हत्याराने गळ्यावर वार करुन जखमी केले आहे.

🖕 Click Here

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात ४२४/२०२३ भादविक ३०७, ३२४, ५०६, ३४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा. पोलीस निरीक्षक, राहुल गिरमकर पुढील तपास करीत आहे.

🖕 Click Here