सिनेकलाकारांना कोयत्याचा धाक दाखवून लूटणाऱ्या दोघांना पोलीसांकडून अटक

93 Avenue Mall news : पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रसिद्ध 93 Avenue Mall समोरील बी.टी.कवडे रोड येथे सिनेकलाकारांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोघांना वानवडी पोलीसांनी जेरबंद केले आहे.

आरोपी 1. स्वप्नील दादा कोतवाल, (वय-23, रा.शिंदे वस्ती, हडपसर) 2.महेश बबन गजेसिंह, (वय-29, रा.भिमनगर, मुंढवा )यांना मोठ्या शितफिने ताब्यात घेण्यात आले.

दि. 21 रोजी पहाटेच्या सुमारास सिनेसृष्टीत ज्युनिअर कलाकार म्हणून काम करणारे फिर्यादी व त्यांचे मित्र हर्ष नाथे व जिशान पटनी सासवड येथे शूटींगसाठी जाण्याकरिता स्वारगेट येथून येणारी बससाठी वाट पाहत थांबले होते.

यावेळी शेजारी टपरीवर चहा घेत असताना फिर्यादी यांना आरोपी यांनी धक्का मारून वाद घालून बाजूस मोकळ्या जागेत नेत कोयत्याचा धाक दाखवत जान प्यारी है क्या फोन प्यारा है चले जाव, अशी धमकी दिली व मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेतली. यावेळी फिर्यादी यांचे मित्र मदतीसाठी पुढे आले असता दोन आरोपींनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम हिसकावून घेतली.

याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात जबरी चोरी प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी सदर घटनेबाबत गांभीर्यपूर्वक तपास करण्याच्या सूचना तपास तथकास दिल्या.

🖕 Click Here

यावेळी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे करत असताना सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा कौशल्यपूर्ण तपास लावण्यात आला.

यावेळी आरोपींकडून मोबाइल, टु व्हिलर मोपेड, कोयता असा एकूण ७४,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलासदर कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार , सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ,

अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, उपायुक्त परि-5 विक्रांत देशमुख , सहा.पो.आयुक्त सौ. पोर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे,

गुन्हे निरीक्षक संदिप शिवले, तपास पथकाचे उपनि संतोष सोनवणे, पो.अं.अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमाले, अतुल गायकवाड, पो.हवा. अमजद पठाण, संतोष नाईक, हरिदास कदम, महेश गाढवे, विनोद भंडलकर, पो.अं.संदिप साळवे, विष्णु सुतार, राहुल गोसावी, निलकंठ राठोड व मनिषा सुतार, सोनम भगत यांनी केली.

🖕 Click Here