पिस्टल व जिवंत काडतुस विनापरवाना बाळगणारे कटटा गँग चे गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
Vimantal police : हडपसर मधील दोन आरोपी पिस्टल व जिवंत काडतुसासहित विमानतळ पोलिसांच्या जाळयात

Vimantal police : पोलीस न्यूज 24 : भारतात कोरोना मुळे लॉकडाऊन असल्याने अनेक गुन्हेगार हे प्यारोल वा जामिनावर बाहेर आले आहे,
यामुळे गुन्हेगारी वाढत आहे अश्या गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पोलोसाना डबल कसरत करावी लागत आहे.
दिनांक ३०/०६/२०२० रोजी सपोनि मुजावर व तपास पथकातील स्टाफ, विमानतळ पोलीस ठाणे पुणे चे गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कार्यालयात हजर असताना
पोहवा ५३५१ आटोळे यांना त्यांच्या गोपनिय बातमी दारांमार्फत बातमी मिळाली की,
दोन इसम साकोरेनगर रोड अॅक्सीस बँकेचे जवळ स्टार नेटवर्क बोर्डजवळ गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्यासाठी थांबलेले असुन त्यांचेकडे पिस्टल आहे,
वगैरे मजकुरची बातमी मिळाल्याने सपोनि मुजावर यांनी बातमीचा आशय वरीष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस ठाणे गजानन पवार यांना कळविला
माहिती मिळताच त्यांनी खात्री करुन कार्यवाही करणेबाबत आदेश दिल्याने विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी सपोनि मुजावर व तपास पथकातील पोलीस स्टाफ पोहवा आटोळे बक्कल नंबर ५३५१,
पोहवा लोहकरे बक्कल नंबर ५५३० , पोहवा काळे बक्कल नंबर ४६६४ , पोना गाडे बक्कल नंबर १७६२ , पोना भिंगारदिवे बक्कल नंबर ४८८४ ,
पो.कॉ कर्चे बक्कल नंबर ८३०९ , पो कॉ सय्यद बक्कल नंबर ७६१४ असे साकोरेनगर रोडवर विमाननगर पुणे येथे सापळा रचला ,
आरोपी नामे १) अजीज जाफर शेख वय ३२ रा -(भारत कालनी हांडेवाडी रोड गंगा व्हिलेज जवळ हडपसर पुणे
२) अमिर शब्बीर सय्यद वय २१ वर्षे सय्यद नगर गल्ली नं १७ आयशा मश्जिद जवळ हडपसर पुणे यांना पकडुन त्यांच्या ताब्यातुन ९२,०००/- रु किं चे एक देशी बनावटीचे पिस्टल,
दोन जिवंत राऊंड व इतर एक मॅगझिन तसेच एविटर मोपेडे असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ
पोलीस स्टेशन पुणे शहर व
पोलीस निरीक्षक गुन्हे विमानतळ पोलीस स्टेशन चे बळवंत मांडगे यांचे सुचनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे जे.सी.मुजावर सहा पोलीस निरीक्षक पोलीस,
पोहवा अशोक आटोळे, पोहवा मोहन काळे, पोहवा लोहकरे, पोना विशाल गाडे,पोना सचिन
भिंगारदिवे,पो.कॉ नाना कर्चे, वसिम सय्यद यांचे पथकाने केली आहे.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: vimantal-police-arrest-2-criminal कटटा गँग चे गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
Pingback: (The prostitution business) महिलांना वेश्या व्यवसायात गुंतवणारा पोलिसांच्या ताब्यात