ऑनलाईन ई-पास काढुन देणाऱ्या भांमट्यावर पोलिसांची कारवाई


🖕 Click Here

Online e pass काढुन देणा-या भांमट्यावर पोलीसांची कारवाई

police-take-action-against-online-e-pass-froud-agent

Online e pass : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : सद्या भारतात , महाराष्ट्रात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून लॉकडाऊन जाहीर केला

असून नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणुन एका जिल्हयातुन दुस-या जिल्हयात व राज्यात ये जा करण्या करीता

शासनाच्या वतीने परवानगीने सदर लॉकडाऊन कालावधीमध्ये लोकांची असुविधा होवु नये म्हणुन

Advertisement

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक परिस्थितीत उदभवलेल्या नागरिकांना प्रवासाकरीता लागणारे ई-पास देण्यासाठी ई-पास सेवा सुरु करण्यात आली आहे.

वैद्यकीय उपचार व अत्यावश्यक सेवेकरीता शहरात ऑटो रिक्षा चालू राहणार

सदर पास ज्यांना हवेत त्यांनी पुणे पोलीसांनी जारी केलेली punepolice.in तसेच महाराष्ट्र पोलीसातर्फे covid19.mhpolice.in यावर

ऑनलाईन अॅप्लीकेशन केल्यानंतर अर्जदाराने दिलेल्या मोबाईल नंबरवर टोकन नंबर देण्यात येतो

Advertisement

व त्यानंतर सदर अॅप्लीकेशनची पडताळणी करुन अर्जदाराचे मोबाईलवर ई-पास मंजुर करुन पाठविण्यात व तसा बारकोड त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठविण्यात येतो.

त्या परवानगीपत्राच्या आधारे सदरची व्यक्ती जिल्हयाबाहेर तसेच राज्याबाहेर अधिकृतरित्या जाऊ शकतात ,

सदरची प्रक्रिया ही सेवा कार्यप्रणालीद्वारे चालू असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार होत नाही.

Advertisement

परंतु पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर बच्चनसिंह यांना माहिती मिळाली की एक इसम महेश वाघमारे,

मोबाईल नं. ८६६८५०८८९८ याने फेसबुक या सोशल मिडीयावर cab sevices is available for within Pune and out of Pune with E-pass.

we Also provide E-pass service. Contact 8668508898 अशी पोष्ट टाकली आहे.

Advertisement

त्याद्वारे माहिती काढुन वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सदर कार्यप्रणाली ई-पासच्या प्रभारी अधिकारी शिल्पा चव्हाण यांच्याकडील शरद देडगे,

सहा. पोलीस फौजदार यांनी सदर इसमाच्या मोबाईलवर फोन करुन त्यांना पुणे ते नाशिक असा प्रवास करणे आहे असे सांगितले,

यावर समोरील व्यक्तीने मी महेश वाघमारे बोलतो असे सांगुन आमचे ऑफीस (मगरपट्टा साई-सवेरा, स.नं. १६१, भोसलेनगर, हडपसर, पुणे)

🖕 Click Here
Advertisement

येथे असुन तुम्हाला ई-पास काढुन देण्यासाठी २,०००/- रुपये व मेडीकल प्रमाणपत्रासाठी ५००/- रुपये असे एकुण २,५००/-रुपये खर्च येईल असे सांगितले.

व्हॉट्सअपव्दारे मटका घेणा-या महिलेस पोलीसांनी घेतले ताब्यात

सुरूवातीला १,५००/-रुपये व पास मंजुर झाल्यावर १,०००/-रुपये द्यावे लागतील तसेच सदरचे पैसे हे लगेच माझे वरील मोबाईल नंबरवर गुगल-पे द्वारे जमा करा, असे सांगितले.

सांगितल्या प्रमाणे महेश वाघमारे याच्या मोबाईल नं. ८६६८५०८८९८ यावर १,५००/- रुपये गुगल पे द्वारे जमा केले

Advertisement

आणि त्याने आधारकार्डची माहिती मागुन लगेचच पी. एच.सी. लोणीकाळभोर, मेडीकल ऑफीसर यांच्या नावाने संबधीत व्यक्तीची कोणतीही वैद्यकिय तपासणी न करता मेडीकल प्रमाणपत्र व्हॉट्सअप वर पाठविले.

यावरुन महेश नामदेव वाघमारे, २७ वर्षे याने पुणे पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी जारी केलेल्या punepolice.in

या ई-सेवापासबाबत सुचना व आदेशाचे उल्लंघन करुन ई-पासची सुविधा ही कोणतीही आर्थिक फि आकारली नसताना

Advertisement

नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी यांनी त्याच्याविरुध्द सरकारतर्फे भा.दं. वि. कलम ४२०, ४६५, १८८ प्रमाणे फिर्याद हडपसर पोलीस ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असुन सदर गुन्हयात त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केले.

अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,पुणे शहर अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर बच्चनसिंह,

Advertisement

सहा. पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनांखाली युनिट-५ चे प्रभारी अधिकारी डी.एल. चव्हाण,

सेवा कार्यप्रणालीचे प्रभारी अधिकारी शिल्पा चव्हाण, सह.पो.निरी संतोष तासगांवकर, पो.उप.निरी. शेंडगे व शरद देडगे, दया शेगर, आश्रुबा मोराळे यांनी ही कामगिरी केली.

पुणे शहरात गोळ्या झाडून युवकाचा खून,

Advertisement
🖕 Click Here

One thought on “ऑनलाईन ई-पास काढुन देणाऱ्या भांमट्यावर पोलिसांची कारवाई

Comments are closed.