गोळीबार करुन फरार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखेने केले जेरबंद


🖕 Click Here

(Crime Branch) कार्तिक संजय इंगवले असे आरोपीचे नाव आहे.

(Crime Branch) क्राईम ब्रांच न्यूज (प्रतिनिधी) :पुणे : काही दिवसांपूर्वी उत्तमनगर येथे गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने जेरबंद केले आहे.

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणे गावामध्ये गोळीबार करून फरार झालेला

सराईत गुन्हेगार निलेश गायकवाड याच्या टोळीतील साथीदार कार्तिक इंगवले हा नाशिक फाटा, पुणे येथे येणार असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती.

Advertisement

सदर ठिकाणी सापळा रचून कार्तिक संजय इंगवले (वय १८ वर्षे, रा. बापुजी बुवा चौक,

रामनगर, वारजे माळवाडी पुणे ) याला ताब्यात घेतले आहे.

वाचा : तलवारीने केक कापून फोटो व्हॉटसअपला स्टेटस ठेवणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक,

Advertisement

त्याच्याकडे माहिती घेतली असता त्याने सांगितले की भांडणाच्या कारणावरून ८ ऑगस्ट रोजी

शिवणे स्मशानभुमी जवळ शिवणे येथे त्याच्या साथीदारसह केदार भालशंकर याच्यावार गोळीबार केला असल्याचे सांगितले आहे.

आरोपीस पुढील तपासकामी उत्तमनगर पालीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

🖕 Click Here
Advertisement

तर इंगवले याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न केले आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे,

सहा पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने,

Advertisement

नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे,

सचिन पवार,ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.

video पहा : सय्यदनगरमध्ये दोन गटात हाणामारी. तलवारी-कोयते नाचवत घातला धुमाकूळ,

Advertisement
🖕 Click Here