पीएमपीएमल बसमध्ये चोऱ्या करणारी टोळी अटकेत.


🖕 Click Here

डेक्कन, दत्तवाडी, शिवाजीनगर, भारती विद्यापीठ, कोथरुड, व इतर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केल्या चोऱ्या.

क्राईम ब्रांच न्यूज प्रतिनिधी पुणे :
कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेवुन रस्त्याने पायी जाणा-या तसेच मोटार सायकलवरुन जाणा-यांना थांबवुन त्यांना घातक हत्याराचा धाक दाखवुन लुटणा-या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेने केला आहे.

२९ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार अनिकेत बाबर,व दत्ता सोनावणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,

पॅगो रिक्षा नं. एमएच- १२- क्युआर -३९६१ मधुन मोहन जाधव, शितल वाडेकर व त्याचे साथीदार सर्व साथीदार रात्रीच्या वेळी बाहेर पडतात व एकांत ठिकाणाचे अंधाराचा फायदा घेवुन रस्त्याने पायी जाणा-या तसेच मोटार सायकलवरुन जाणा-यांना थांबवुन त्यांना घातक हत्याराचा धाक दाखवुन त्यांच्याकडील पैसे व अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावुन तसेच महिलांच्या हातातील बांगडया कट करुन गुन्हे करतात व आता पुर्ण तयारीनिशी दरोडयाचा गुन्हा करण्यासाठी पुणे शहरात फिरत असुन ते पुण्यातील डेक्कन चौपटीजवळच्या नदीपात्र लगत जाणार आहे,

Advertisement

अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याप्रमाणे कार्यवाही करण्याकरीता युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले.

डेक्कन चौपटीजवळच्या नदी पात्रात गुप्तपणे सापळा लावून गुप्तपणे पाहणी करता पॅगो रिक्षा नं. एमएच/१२/क्युआर/३९६१ मधुन काही इसम व महिला येवुन ओकारेश्वर मंदीराच्या मागील भिंतीलगत शनिवार पेठ येथे रिक्षा पार्क करुन आडबाजुस संशयीतरित्या एकत्र जमुन आपसात चर्चा करीत असताना दिसले

खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकुन सदर इसमांना व महिलांना जागीच पकडुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता रिक्षा चालकाने आपले नाव अरुण शिवाजी गायकवाड वय ३८ वर्षे रा.आनंदनगर सर्वोदय कॉलनी म्हसोबा मंदीराशेजारी मुंढवा,

Advertisement

मोहन गणेश जाधव वय ३० वर्षे रा. सनं ५ संभाजी चौक,केशवनगर मुंढवा, शिवराज अर्जुन वाडेकर वय २२ वर्षे रा भोलेनाथ मंदीराजवळ आनंदनगर सर्वोदय कॉलनी मुंढवा,

प्रशांत मिठु थोरबोले वय २२ वर्षे रा लेन नं १ घुले कॉलनी शिवाजी महाराज पुतळा मांजरी बुद्रुक तसेच महिलांनी आपली नावे शितल श्रीनिवास वाडेकर (वय २९ वर्षे रा सनं ९४ भोलनाथ मंदीराजवळ सर्वोदय कॉलनी मुंढवा)

भिमबाई रमेश बजंत्री (वय ४५ वर्षे रा. सदर) असे असल्याचे सांगितले.

Advertisement

सर्व गुन्हेगार हे दरोडा घालण्याचे तयारीत असताना मिळुन आले आहे.

🖕 Click Here

त्यांच्या विरुध्द पोलीस अंमलदार राहुल देवराम मखरे यांनी फिर्याद दिल्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारांकडे तपास करता सदर आरोपीनी विश्रामबाग पोलीस ठाणे ३, डेक्कन पोलीस ठाणे २, दत्तवाडी पोलीस ठाणे २ गुन्हे, शिवाजीनगर पोलीस ठाणे,

Advertisement

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे,कोथरुड पोलीस ठाणे कडील प्रत्येकी १ गुन्हा असे १० चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केलेले आहे.

तर शितल श्रीनिवास वाडेकर हिचे विरुध्द मुंढवा, बंडगार्डन, डेक्कन, स्वारगेट,

बिबवेवाडी व वारजे माळवाडी इतर पोलीस ठाणेत ११ गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

तर गुन्हेगार मोहन गणेश जाधव याचे विरुध्द मुंढवा पोलीस ठाणेस १ गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त पुणे अमिताभ गुप्ता,सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे,

सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड,

Advertisement

सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, अनिकेत बाबर, शशीकांत दरेकर, राहुल मखरे, विजेसिंग वसावे,

महेश बामगुडे, इम्रान शेख, अजय थोरात, अमोल पवार, अशोक माने, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर,

मिना पिजंण, रुक्साना नदाफ यांनी केली.

Advertisement

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी हे करीत आहेत.

🖕 Click Here