सराफ व्यावसायिकाला पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला अटक
(Rs-50-lakh-ransom) विकास भल्ला ,अमित मीरचंदाणी , संतोष राठोड व इतर आरोपींचा शोध सुरू आहे,
(Rs-50-lakh-ransom) क्राईम ब्रांच न्यूज :
पुणे : पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाला आयकर विभागाने चे आक्षेप घेतल्याची बतावणी करून प्रकरण मिटवण्यासाठी पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला युनिट एकच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
रूपेश ज्ञानोबा चौधरी ( वय ४६ , रा . फ्लॅट नं . बी / ३०३ , तुळशीबाग कॉलनी , सहकारनगर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे .
यापूर्वी त्याच्यावर दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे भादंवि ३८४ , ३८५ , ३८६ , ३८७ , ३४ आयटी अॅक्ट ६६ ( ई ) प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल आहे .
तक्रारदार हे सराफ व्यावसायिक आहेत .
वाचा : शिक्षकाचा आठ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौधरीसह अमित मीरचंदाणी ( रा . शनिवार पेठ ) ,
विकास रूपलाल भल्ला ( रा . क्लाऊड नाईन सोसायटी , एनआयबीएम रोड , कोंढवा ) ,
संतोष राठोड ( रा . पॉप्युलर हाईट्स , शाहू चौक ) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे .
रूपेश चौधरीला शुक्रवारी पहाटे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले .
त्याला न्यायालयात हजर केले असता , त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
विकास भल्ला ,अमित मीरचंदाणी , संतोष राठोड व इतर आरोपींचा शोध सुरू आहे .
वाचा : आजीला भेटण्यासाठी आला अन पोलिसांच्या हाती सापडला !
ही कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे ,
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , सुनील कुलकर्णी ,
पोलीस अंमलदार सतीश भालेकर , दत्ता सोनावणे , राहुल मखरे ,
महेश बामगुडे आणि रुक्साना नदाफ यांनी केली .
याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड हे करीत आहेत .
वाचा : दर शनिवारी न्यायालय सुरू,

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822