व्यापा-याची रोकड लुटणारे दोन सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट -१ ने केले जेरबंद .


🖕 Click Here

दिनांक २३ मार्च रोजी सकाळी ११/३० वाजता पन्ना एजन्सी नानापेठ , पुणे या सिगारेट व बडीशेपचे डिलरशिप असलेल्या दुकानातील मालाचे विक्रीतील रोख रक्कम दुकानातील कामगार नामे मंगलपुरी मिकमपुरी गोस्वामी ,( वय ५५ वर्ष रा मंगळवारपेठ , पुणे ) हे बँकेत भरण्यास अॅक्टीव्हा स्कुटरने जात असताना पाठीमागून आलेल्या

डोळ्यास गॉगल घातलेला, तोंडास मास्क लावलेला , डोक्यास टोपी लावलेले २० ते २५ वर्ष वयाचे दोन इसमांनी त्यांचे मागून काळे रंगाचे मोपेडवरून येवून फिर्यादी यांच्या गाडीस मागून धक्का देवून तुला गाडी निट चालवीता येत नाही का ? असे म्हणुन त्यांचा रस्ता आडवून दोघापैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण करून त्यांच्याकडील रोख ४७,२६,००० / – रु व १४ चेक असलेली बॅग जबरीने चोरून नेली होती.

सदरबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून समर्थ पोलीस ठाणे येथे गुर नं . ७५/२०२३ भादवि कलम ३ ९ ४.३४१,३४ महा पोलीस अॅक्ट ३७ ( १ ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Advertisement

भरवस्तीमध्ये घडलेल्या गंभीर गुन्ह्यामुळे दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेणेबाबत वरिष्ठांनी आदेशीत केले होते .

आरोपींनी वापरलेल्या काळे रंगाचे मोपेडचा नंबर आरोपींनी दोन्ही बाजुचे नंबरप्लेटवर चिखल लावल्याने नंबर प्राप्त झाला नव्हता व तोंडास मास्क , डोक्यास टोपी , डोळ्यास गॉगल लावल्याने त्यांची ओळख पटविणे व त्यांचा छडा लावणे हे पोलीस समोर एक आव्हान होते .

गुन्हे शाखा -१ चे सहा पोलीस आयुक्त सुनिल पवार तसेच युनिट -१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तसेच युनिट १ कडील पथक असे दाखल गुन्ह्याचा समर्थ पोलीस ठाणेसह समांतर तपास करीत असताना गुन्हा घडलेल्या ठिकाणापासून पुणे शहरातील बाणेर , हिजवडी , गहुंजे असे ठिक ठिकाणचे एकुण २०० ते २५० सी सी टी व्ही फुटेज आहोरात्र चेक करण्यात आले तसेच सहा पोलीस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रीकबाबींची मदत घेवून दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना दिनांक २८मार्च रोजी सायंकाळी स पो फौजदार राहुल मखरे व पो शिपाई दत्ता सोनवणे याना गुप्त बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की दाखल गुन्हा हा किरण पवार व त्याचा साथीदार नामे आकाश गोरड यांनी केला असून किरण पवार हा वाघोली परिसरात लपुन बसला असून त्याचा साथीदार आकाश गोरड हा पवना डॅम कोथुरणेगाव येथे पळून गेला असून त्यांचेकडे लुटलेली रक्कम आहे .

Advertisement

अशी खात्रीशीर बातमीप्राप्त झाल्याने लागलीच गुन्हे शाखा युनिट १ कडील अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करून दिनांक २८मार्च रोजी रात्रीच वाघोली व पवना डॅम , कोथुरणे , ता मावळ , जि पुणे येथे रवाना करण्यात आले होते .

🖕 Click Here

आरोपींबाबत काहीएक मागोवा नसताना त्यांचा रात्रभर शोध घेत सदर ठिकाणी रहाणारे रहिवाशी यांचेकडे कौशल्यापुर्ण चौकशी करून दिनांक २ ९ मार्च रोजी संशयावरून आरोपी नामे आकाश कपिल गोरड (वय २१ वर्ष स बी / ३७ , रूम नं २ अप्पर बिबवेवाडी व्हिआयटी कॉलेजजवळ पुणे ) यास पवणा डॅम कोथुरणे गाव , ता मावळ , जि . पुणे येथून ताब्यात घेतले असता आरोपीने स्वताचे नाव खोटे सांगीतले तसेच केस बारीक करून स्वताची ओळख लपवीण्याचा प्रयत्न केला परंतू त्याच्याकडे कसुन चौकशी करता त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली .

तसेच त्याचेकडून लुटलेल्या रकमेतील रोख १,००,००० / – रू जप्त करण्यात आले आहेत .

Advertisement

तसेच मिळालेल्या बातमीच्या आधारे ताब्यातील आरोपीचा साथीदार नामे किरण अशोक पवार (वय २५ वर्ष रा बी / २४/११ अप्पर बिबवेवाडी , व्हिआयटी कॉलेजसमोर , पुणे) यास वाघेश्वर मंदीर वाघोली जि पुणे येथून ताब्यात घेवून त्याच्याकडून लुटलेल्या रकमेतील रोख ४,००,००० / – रू असे एकुण ५,००,००० / – रूपये जप्त करण्यात आले आहेत .

दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या विरूध्द भारतीविद्यापीठ , बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न , दुखापत करणे बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत .

वरील दोन्ही आरोपींना पुढील कारवाईकामी समर्थ पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त , पुणे शहर , रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , अमोल झेंडे पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , पुणे शहर सुनिल पवार , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद , पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी , पोलीस अंगलदार दत्ता सोनवणे , शुभम देसाई , राहुल मखरे , अभिनव लडकत , निलेश साबळे , महेश बामगुडे आय्याज दडीकर , विठ्ठल साळुंखे , अनिकेत बाबर , शशीकांत दरेकर यांनी केली आहे .

Advertisement

🖕 Click Here