Skip to content
ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यालयाकडील उल्लेखनीय कामगिरी.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरातील पोलीसांनी केलेल्या आपलूकीची मदतीचे सर्वत्र ठिकाणी कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हकीकत अशी की गंदाकीनी भुमकर व त्यांचे कुटंबीय असे ई-३०६. रग्यनगरी सोसायटी, बिबवेवाडी, पुणे-३७, येथे रहावयास
आहेत. त्यांनी सन २०१९ मध्ये हडपसर पुणे येथे त्यांचे मालकीचा असलेला दुसरा फलॅट सुनील राख यांना भाडे
तत्वावर १ वर्षाच्या करारावर रितसर करारनामा करुन दिलेला होता. पहिले ६ महिने भाडेकरी यांनी घराचे भाडे व सोसायटीचा
मेंटेनन्स वेळेवर दिलेला होता. परंतु ६ महिन्यांनंतर भाडेकरु हे घरभाडे व सोसायटीचा मेंटेनन्स देण्यास टाळाटाळ करु लागले.
त्यागुळे सोसायटीकडुनही मेंटेनन्सबाबत वारंवार कंमप्लेट येउ लागल्या. तसेच फ्लॅटचे लाईटबील भाडेकरी यांनी भरणे गरजेचे
असुनही त्यांनी ते वेळेवर न भरल्याने विजमंडळाने सदरील घराचे विजमिटर काढुन नेले. सदरबाबत विचारणा करावी तर भाडेकरी
करणेही कठीण झाले होते. त्यानंतर भाडेकरी यांनी मेटेनन्स भरणेकरीता सोसायटीला चेक दिला तोही भाडेकरी यांचे
वैयक्तीक अडचणींमुळे रहावयास जायचे असल्या कारणाने त्यांनी भाडेकरी यांना १ महिना अगोदर फलॅट खाली करणेबाबत
कायदेशीर नोटीसही दिली होती. परंतु भाडेकरी फ्लॅट खाली करुन देत नव्हता.भाडेकरुच्या अशा विक्षीप्त वागण्यामुळे
कंटाळून जाउन ज्येष्ठ नागरिक यांनी ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे तक्रारी अर्ज व्हॉट्सअप व्दारे दिला. सदरचा अर्ज दि.५/६/२०२०
रोजी कक्षाकडे प्राप्त होताच गैरअर्जदार/भाडेकरी यांना कक्षातील हेल्पलाईनवरुन फोन केला ज्येष्ठ नागरिक यांचे मालकीचे
असलेला फ्लॅट तात्काळ खाली करुन त्याचे सोसायटीचा मेंटेनन्स, घरभाडे व विजबीलाचा भरणा करुन घरमालक महिला यांचे
ताब्यात घराची चावी देण्याबाबत समुपदेशन केले व तसे न झाल्यास ज्येष्ठ नागरिक कायदयानुसार योग्यती कायदेशीर
कारवाई करण्यात येईल असे सांगीतले, यावर संबंधीत भाडेकरी यांनी १० दिवसांची मुदत मागीतली व त्यानुसार आज दि.१२जून
रोजी भाडेकरी यांनी सर्व देयकांची पुर्तता करुन फ्लॅटची चावी घरमालक महिला यांचे मुलाकडे दिली आहे असे कक्षात फोन
करुन सांगीतले वरुन अर्जदार यांना फोन करुन विचारले असता त्यांनी केलेल्या तक्रारी अर्जाचे संदर्भाने त्यांचे समाधान झाले
असुन लॉकडाउनच्या काळातही पोलीसांनी मदत केली आहे.तक्रारदार यांचे तक्रारीचे अनुषंगाने पोलीस आयुक्त के.
व्यंकटेशम यांचे संकल्पनेतुन तसेच अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, व पोलीस उप आयुक्त, गुन्हे, बच्चनसिंह यांचे
मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वैशाली चांदगुडे तसेच मपोनि पुन्म बारसकर यांनी वेळेत मदत
केलेबद्दल भुमकर यांनी समाधान व्यक्त करत ज्येष्ठ नागरिक कक्षाचे आभार व्यक्त केले आहे.
Pingback: (Yerawada Jail) येरवडा कारागृहातून पुन्हा कैदी पळाले, सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ?