सिगारेट दुकानफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीस गुन्हे शाखा १ ने केले जेरबंद

सिगारेट दुकानांच्या घरफोड्या करणारी आंतरराज्यीय चोरट्यांची टोळी जेरबंद

क्राईम ब्रांच न्यूज :पुणे : नानापेठ येथील जय अबे ट्रेडर्स किराणा दुकानाचा पाठीमागचा दरवाजा व लॉक तोडून ५.० ९ , ३५० / – रुपये किंमतीची सिगारेटची पाकिटे व बॉक्स असा माल चोरुन पसार झालेल्यांना गुन्हे शाखा १ ने केले जेरबंद.

दिनांक १६/०४/२०२३ रोजी फिर्यादी यांनी त्याचे नानापेठ येथील जय अबे ट्रेडर्स किराणा दुकानाचा पाठीमागचा दरवाजा व लॉक कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडुन दुकानाच्या आत प्रवेश करुन ५.० ९ , ३५० / – रुपये किंमतीची सिगारेटची पाकिटे व बॉक्स असा माल चोरुन नेलेबाबत दि . १७/०४/२०२३ रोजी समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९ ६ / २०२३ . भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .

वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली युनिट १ , गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अमलदार असे समांतर तपास करीत असताना गुन्ह्यातील घटनास्थळावरील आजुबाजुचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे तीन आरोपींचे वर्णन निष्पन्न करून सदर आरोपी है रिक्षा मध्ये बसुन गेल्याचे दिसून आले .

सदर रिक्षाच्या बाहेरील वर्णनावरुन सदरच्या रिक्षाचा वडगाव शेरी पर्यंत मागोवा घेतला असता सदर संशयित आरोपी है साईकृपा हौसींग सोसायटी वडगाव शेरी पुणे येथे रिक्षातुन उतरल्याचे निष्पन्न केले .

त्यानंतर दि . २५.०४.२०२३ रोजी पोलीस अंमलदार , अमोल पवार व आण्णा माने यांनी सदर वर्णनाचे आरोपींचा शोध घेतला असता सदर तीन आरोपीपैकी एक आरोपी हा साईकृपा होसींग सोसायटी , वडगाव शेरी पुणे येथे रहात असलेबाबत खात्री केली .

सदरची आरोपीबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ , शब्बीर सैय्यद यांना कळविली असता त्यांनी लगेच सपोनि आषिश कवठेकर व अमलदार यांची टीम तयार करून त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले .

त्यानुसार युनिट एकचे अधिकारी व अमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता एक इसम मिळुन आला त्यास त्याचा नाव पत्ता विचारला असता , त्याने त्याचे नाव १. (बुधाराम वियाराम चौधरी , वय -४५ वर्षे , रा . साईकृपा हौसींग सोसा . वडगाव शेरी , पुणे , मुळगांव – रा . राणी वाल , ता . जितारण , जि . पोली , राजस्थान ) असे असल्याचे सांगितल्याने तो रहात असलेले रुमची झडती घेतली असता त्याचे रुम मधील किचन ओट्या खाली सिगारेटच्या पाकीटानी भरलेल्या पिशव्या मिळुन आल्या .

त्याबाबत सदर इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर सिगारेटने भरलेल्या पिशव्या ह्या त्याचे इतर साथिदारांसह मिळुन नाना पेठ पुणे येथील एका दुकानाच्या मागील बाजुच्या दाराचे लॉक कटावणीच्या सहाय्याने तोडुन सदरचा माल चोरला असल्याचे सांगितले .

🖕 Click Here

तसेच आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषन केले असता आरोपी बुधाराम चौधरी याचा चावर मंडई परिसरात दिसुन आल्याने त्याच्याकडे त्याबाबत अधिक तपास केला असता मंडई परिसरातील एक सिगारेट विक्रीचे दुकानातुन सुध्दा माल चोरला असल्याचे सांगितले .

सदरचा माल हा वरिल गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी असल्याचे निष्पन्न झाल्याने एकूण ४,१०,००० / – रु . किंचा मुद्देमाल जप्त करून तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे . त्यानंतर आरोपीचे साथीदार नामे

२ . रामलाल ढगळाराम चौधरी , (वय २ ९ वर्ष ३ महाविर बगदाराम मेघवंशी , वय १ ९ वर्ष दोघेही सध्या रा . दत्तवाडी , पुणे मुळगांव – रा . राणीवाल , ता . जितारण , जि.पोली , राजस्थान ) असे आ.क्र .१ ते ३ यांना अटक केले आहे .

सदर तिन्ही आरोपीकडुन समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९ ६ / २०२३ , भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० व विश्रामबाग पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन कडिल एक असे एकुण दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन आरोपी व मुद्देमाल पुढिल कारवाईकामी समर्थ पोलीस स्टेशन यांच्याकडे ताब्यात देण्यात आलेले आहेत .

सदर आरोपी बुधाराम वियाराम चौधरी यावर यापूर्वी पुणे शहरात विश्रामबाग , कोंढवा , समर्थ , हडपसर अशा विवीध पोलीस ठाण्यात घरफोडी , चोरी अशा प्रकारचे एकुण १० गुन्हे दाखल आहेत .

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त , पुणे शहर , रितेश कुमार , सह पोलीस आयुक्त , पुणे शहर संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे पुणे शहर श्री रामनाथ पोकळे ,पोलीस उप आयुक्त , गुन्हे , पुणे शहर अमोल झेंडे , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ पुणे शहर सुनिल पवार , यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षकर , शब्बीर सैय्यद , सपोनि आषिश कवठेकर , पोउपनिरी अजय जाधव , सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार , अमोल पवार आण्णा माने , इम्रान शेख , निलेश साबळे , शुभम देसाई दत्ता सोनावणे, महेश बामगुडे , विठ्ठल साळुंखे , अय्याज दड्डीकर , अभिनव लडकत , राहुल मखरे , शशिकांत दरेकर , अनिकेत बाबर , तुषार माळवदकर यांनी केली आहे .

🖕 Click Here