मौजमजेसाठी वाहनचोरी करणा-या गुन्हेगारांना अटक

Vehicle theft arrested :चोरांकडून ४ लाखांचे वाहने जप्त,

Vehicle theft arrested : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

शहरात वारंवार घडत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करुन गुन्हेगारांना अटक करण्याच्या कामात गती आली आहे.

वाहन चोरीच्या वाढत्या घटना पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे पोलिसांनी वाहन चोरीचे हॉट स्पॉट तयार करुन सदर ठिकाणी सापळे लावले आहेत.

गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे व अंकुश जोगदंडे हे वाहन चोरीबाबत तपास करत होते,

हडपसर भागांतील वाहन चोरीतील गुन्हयांच्या अनुषंगाने परिसरांत पेट्रोलिंग करत असताना त्यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत वाहन चोरांची माहिती मिळाली.

वाचा : अभिनेत्री कंगना राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. पुण्यातील वकिलांची मागणी,

मिळालेले माहितीवरुन युनिट-५ कडील अधिकारी व कर्मचारी यांच्या सह सदर भागांत सापळा रचून आरोपी सचिन हनुमंत थोरात,

(वय – २९ वर्षे, रा. मालधक्का आर्शिवादनगर, लाईन नं. २, पवार यांची बिल्डींग, दुसरा माळा, फुरसुंगी

ईश्शाद युनूस पठाण, वय ३२ वर्षे, रा. बबलु शिंदे यांच्या घरात भाडयाने, (भिमनगर आंबेडकर पुतळया समोर,आंबेडकर थॅरमेक्स चौक, आकुर्डी गांव, पुणे)

(मुळ गाव मु.पो.घारगाव ता.परांडा जि.उस्मानाबाद श्रावण ऊर्फ महेश वसंत साबळे वय-२४ वर्षे धंदा-)

ड्रायव्हर रा.बाळासाहेब शिंदे यांच्या घरी भाडयाने,(मार्ग वस्ती पेठ रोड,कुंजीरवाडी,

🖕 Click Here

ता.हवेली जि.पुणे मुळगांव मु.पो. फुलसांगवी, जिल्हा परीषद शाळेच्या मागे, ता. शिरुर कासार जि.बीड) यांना ताब्यात घेण्यात आले.

वाचा : सहा वर्षांपासून जन्मदाता बापच पोटच्या मुलीवर करत होता बलात्कार

तपासात त्यांचा सहभाग गुन्हयात निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आरोपींनी मौजमजेसाठी ग्रामीण,

सोलापुर ग्रामीण व इतरत्र जिल्हयातील दुचाकी वाहने, चैन व चोरी केल्याचे उघड झाले आहे.

तर त्यांच्याकडून ४ लाख ६० हजारांचे १६ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

पुणे शहरातील वाहनचोरीचे दाखल असलेले ९ गुन्हे, पुणे ग्रामीण ३ गुन्हे,

सोलापुर ग्रामीण- ०१, पिंपरी चिंचवड आयुक्तालय मधील १ गुन्हा असे एकुण १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

Birthday party Ko Lee gai Talwar padi bhari

🖕 Click Here

One thought on “मौजमजेसाठी वाहनचोरी करणा-या गुन्हेगारांना अटक

Comments are closed.