कंपनीचा बनावट लोगो वापरुन कुकर तयार करणाऱ्या गोडाऊनवर पोलीसांचा छापा,

एकाच वेळी दुकानात व गोडाऊनवर छापा.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : हॉकिंस प्रेशर कुकरचे बनावट लोगो तयार करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील एका दुकानावर व त्याच्याच गोडाऊनवर पोलीसांनी छापा मारल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

हकीकत अशी की टी. एफ.कोठारी,१६२९, शुक्रवार पेठ, पुणे या दुकानात Hawkins कंपनीचे स्वामीत्व हक्क असलेले कंपनीच्या लोगोचा वापर करून त्यावर Maggisun असे नाव लिहुन सदरचे

लोगो प्रेशर कुकरवर चिकटवुन विक्री करीत असल्याची बातमी मिळाली असता सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे अनघा देशपांडे यांनी पडताळणी करून टी. एफ.‌ कोठारी या दुकानात व शंखेश्वर युटेन्सील्स अॅण्ड अप्लायन्सेस प्रा.लि. स.नं.१४४, गणेश नगर फुरसुंगी, पुणे या कंपनीच्या गोडाऊनमध्ये एकाचवेळी छापा टाकून कारवाई करण्यात आली.

सदर ठिकाणावरुन Maggisun प्रेशर कुकरचे बॉक्स विविध आकाराचे व क्षमतेचे १२८४ नग असा १७ लाख ४५ हजार ९५५ रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नवीन माल तयार करण्यासाठी वारपण्यात येणारे ५००० लोगो स्टीकर्स व १२६० कागदी रॅपर त्यावर Hawkins कंपनीचे स्वामीत्व हक्क असलेले त्यावर Maggisun असे नाव असलेलसा साहित्यप्त करून फराराखाना पोलीस ठाण्यात,

🖕 Click Here

दिलीप फुलचंद कोठारी, वय-५६ वर्षे, रा.२०८, मंगळवार पेठ, पुणे व विनोद तखतमल जैन वय-६१ वर्षे, रा.१६२९, शुक्रवार पेठ, पुणे यांच्या विरुद्ध कॉपीराईट अॅक्ट व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीनिवास घाडगे पोलीस उपआयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे व पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांचे सह सामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस अंमलदार

राजेंद्र कुमावत बाबा कर्पे, अण्णा माने,हणमंत कांबळे, मनिषा पुकाळे,निलम शिंदे, संतोष भांडवलकर,प्रफुल्ल गायकवाड यांनी केलेली आहे.

🖕 Click Here