ये तु कुठे चाललाय असे म्हणत खिशातील मोबाईल चोरत चोरटे झाले पसार,
Mobile chori news : खडक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
Mobile chori news : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
चोरांनी पुणे शहरात धुमाकूळ घातला असून नागरिकांना घरातून बाहेर पडणं ही अवघड करुन ठेवलंय.
भर रस्त्यात चालत असलेल्या लोकांना थांबवून त्यांच्याकडील असलेले महागडे वस्तू चोरुन नेण्याचे प्रकार घडत आहेत.
असाच प्रकार पुणे शहरातील मध्यवर्ती भागात घडला आहे.
वाचा : अजित पवार, धनंजय मुंडे हाजीर हो : पोलीसांची दिग्गजांना नोटीस
प्रकाश कुरले (५८ वर्षे, रा.स्वारगेट पुणे )हे रात्री दहाच्या सुमारास शिवाजी रोडवरील घनश्याम लॉज समोरून चालत जात असताना,
त्यांच्या मागून मोपेड दुचाकीवरून आलेल्या चोरांनी गाडी थांबवत कुरले यांच्या जवळ गेले,
ये तु कुठे चाललाय असे म्हणुन फिर्यादी यांचे शर्टच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढून घेतला,
कुरले यांनी विरोध केला असता चोरांनी कोयत्या सारखे धारधार हत्याराने त्यांच्या उजव्या हाताच्या पंज्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
व १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढुन घेवुन स्वारगेटच्या दिशेने पळुन गेले .
या संदर्भात खडक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
VIDEO पहा : महेश लांडगेंचा राजीनामा ?

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (pune police commissioner Order)पोलीस निरीक्षकासह 5 पोलिसांच्या वेतनवाढीला