येरवड्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद,

तीन गुन्हे उघड,एका दुचाकीसह 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, येरवडा पोलिसांची कामगिरी.


Crime branch news: पुणे – दुचाकीवरून आलेल्या इसमांनी जबरदस्तीने 25 हजारांची जबरीचोरी केल्याची घटना रामवाडी येथे घडली होती.


Crime branch news: पुणे – दुचाकीवरून आलेल्या इसमांनी जबरदस्तीने 25 हजारांची जबरीचोरी केल्याची घटना रामवाडी येथे घडली होती.

या गुन्ह्याचा तपास करत असताना येरवडा पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिताफिने तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे.

आरोपी असलम इस्माईल शेख (वय 20, रा.चिंतामणीनगर हडपसर) व बिलाल इस्माईल शेख (वय 21रा. सय्यदनगर हडपसर) यांच्याकडून आणखी एक जबरी चोरी व चोरी असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामवाडी येथे दुचाकी वरील इसमाची अज्ञात दोन इसमांनी दुचाकीवरून येऊन जबरदस्तीने खिशातील पंचवीस हजार रुपये जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत कांबळे व सुशांत भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपी मंहमदवाडी वानवडी या भागात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

🖕 Click Here

तात्काळ तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी या ठिकाणी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. अधिक तपासात रामवाडी येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील रोख दहा हजार व 60 हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तसेच याच आरोपींनी विश्रामबाग येथे वीस हजारांची जबरी चोरी तर विश्रांतवाडी येथे तीस हजार रुपयाची चोरी केल्याचे तपासात कबूल केले आहे.

या आरोपींकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात येरवडा पोलिसांना यश आले. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम.

गुन्हे निरीक्षक जयदीप गायकवाड, श्रीमती कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, श्रेणी उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, हवालदार गणपत थिकोळे,

दत्ता शिंदे, तुषार खराडे नाईक किरण घुटे,अमजद शेख, सागर जगदाळे कैलास डुकरे, प्रवीण खाटमोडे, अंमलदार अनिल शिंदे,राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.

🖕 Click Here