डॉक्टरच्या केबिनमध्ये घुसून महिलेने डॉक्टरला चप्पलने मारले.


🖕 Click Here

Crime news: खळबळजनक असा प्रकार दौंड शहरात समोर आलेला असून एका महिलेने डॉक्टरला मारहाण केल्यानंतर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी महिलेने डॉक्टरसोबत कुठलीही चर्चा न करता वेटिंग रूम मध्ये गोंधळ घातला आणि कर्मचाऱ्यांसोबत डॉक्टरला देखील मारहाण केली.

उपलब्ध माहितीनुसार , डॉक्टर तात्या भगवान निंबाळकर ( राहणार लिंगाळी तालुका दौंड जिल्हा पुणे ) यांचे श्री साई हॉस्पिटल असून आरोपी महिलेने त्यांना टेबलवरील पेपरवेटने मारहाण केली.

Advertisement

आरोपी असलेली महिला ही देखील डॉक्टर असून डॉक्टर अश्विनी अमोल वाळुंज ( राहणार पिंपळे गुरव पिंपरी चिंचवड पुणे ) असे तिचे नाव आहे.

अनधिकृतपणे हॉस्पिटलमध्ये घुसणे यासोबत इतर कलमांतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आरोपी अश्विनी ही निंबाळकर यांच्या हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये आली त्यानंतर कॅश काऊंटरवरील कर्मचाऱ्यांशी वाद सुरु केला.

डॉक्टर त्यावेळी तपासणी करत होते म्हणून बाहेर येऊ शकले नाहीत याच दरम्यान अश्विनी त्यांच्या केबिनमध्ये घुसली आणि काही एक संवाद न करता पायातील चप्पल काढून डॉक्टरांना मारू लागली.

🖕 Click Here
Advertisement

👉 भारत-पाक मॅच को देखते हुए सुरक्षा के कड़े इंतजाम, फूल एचडी कैमरे वाले ड्रोन से होगी निगरानी

टेबलवरचा प्लास्टिकचा पेपरवेट देखील तिने डॉक्टरांना फेकून मारला.

आरोपी महिलेने फेकलेले पेपरवेट डॉक्टरांच्या कपाळावर लागले त्यानंतर महिलेने त्यांना शिवीगाळ करत आत्महत्या करून तुमचे आणि हॉस्पिटलमधल्या सर्वांचे नाव घेऊन तुम्हाला गुन्ह्यात अडकवून जाईल अशी देखील धमकी दिली. सहाय्यक डॉक्टर यांना देखील महिलेने मारहाण केली असे त्यांनी म्हटलेले आहे घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही .

Advertisement
🖕 Click Here