२० वर्षीय तरुणीकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार.


🖕 Click Here

मुंबईच्या चेंबूर परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर एका तरुणीने वारंवार अत्याचार केल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाआहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात २० वर्षीय तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेपण वाचा : पत्नीला वेश्याव्यवसायाला लावणाऱ्या पतीसह दोघांना अटक

टिळकनगर पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे.
या घटनेनं परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय पीडित मुलगा आणि २० वर्षीय आरोपी तरुणी एकाच परिसरात राहतात.
काही दिवसांपूर्वी दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर तरुणीने अल्पवयीन मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.

इतकंच नाही, तर त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार देखील केला. दरम्यान, महिनाभरापूर्वी मुलगा आणि तरुणी दोघेही गायब झाले होते.

याबाबत मुलाच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस दोघांच्या ही शोधत होते.

🖕 Click Here
Advertisement

दरम्यान, पोलिसांनी दोघांचेही मोबाईल लोकेशन चेक केले असता, ते चेन्नईमध्ये असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांचं एक पथक चेन्नईला रवाना झालं होत तेथून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं.

याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
🖕 Click Here