महिला पोलिसांना आठ तास ड्यूटी
(Eight hours duty to female police) पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी हा आदेश जारी केला आहे.
(Eight hours duty to female police) क्राईम ब्रांच न्यूज प्रतीनिधी :
पुणे : पोलीस दलातील कामकाज सांभाळून कुटुंबीयांनाही वेळ देता यावा व मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे या उद्देशाने शहर पोलीस दलातील महिला पोलिसांना येत्या सोमवारपासून ( दि . २७ ) आठ तास ड्यूटी दिली जाणार आहे .
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी हा आदेश जारी केला आहे.
शहरातील एक हजारहून अधिक महिलांना याचा लाभ होईल .
जिल्ह्यापाठोपाठ शहरातही या स्वरूपाचा निर्णय झाल्याने महिला पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .
पोलिसांना आठ तास ड्यूटी देण्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी शहर पोलीस दलात करण्यात आला होता .
दिवंगत पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी संपूर्ण राज्यभरातील पोलिसांसाठी यास्वरूपाचा निर्णय घेतला होता .
तथापि , वाढती लोकसंख्या , गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि त्या तुलनेत तोकडी पोलीस संख्या यामुळे हा प्रयोग परिणामकारक राबवणे प्रत्यक्षात शक्य झाले नाही .
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दोन महिन्यापूर्वी महिला पोलिसांना आठ तास ड्यूटीचा निर्णय जारी केला .
त्याची परिणामकारकता व उपयुक्तता लक्षात घेऊन राज्यभरात या स्वरूपाचा निर्णय घेतला जाईल , असे सूतोवाच पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले होते .
नागपूरपाठोपाठ पुणे जिल्हा पोलीस दलात या महिन्यापासून या स्वरूपाची योजना राबविण्यात आली .
वाचा : त्या पीडित मुलीवर मुंबईतही लैंगिक अत्याचार

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Flying kiss to girl news ) मुलीला फ्लाईंग किस देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल