अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी केले २ वर्षा करीता तडीपार,
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी काढले आदेश.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पुणे शहरात आता गुन्हेगारांना अभय मिळत नाहीये. गुन्हेगारांसंदर्भात पोलीसांनी कंबर कसली आहे.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दर्शन युवराज हळंदे वय २० वर्षे, रा.दत्तमंदिराजवळ, राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगर, सागर ऊर्फ सुधिर महादेव मसणे, वय १९ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, दत्तमंदिराजवळ, बिबवेवाडी पुणे,
खुशाल उर्फ दादया संतोष शिंदे वय- २० वर्षे रा-राजीवगांधीनगर, अप्पर,इंदिरानगर, बिबवेवाडी यांचेवर बिबवेवाडी व इतर पोलीस ठाणे शरीराविरुध्द व मालाविरुध्द गुन्हे असुन ते त्यांचे गुन्हेगारी
प्रवृतीचे गुंड मित्रांसह राहत असलेल्या परिसरातील नागरिकांना अडवुन त्यांना मारहाण, शिवीगाळ करून त्यांना दमदाटी करत असतात.
वेळप्रसंगी हत्याराचा धाक दाखवुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन त्यांचे कडील पैसा लुटने, खंडणी मागने, घरात घुसुन धमकी देणे अश्या प्रकारचे गंभिर गुन्हे करुन जनमानसांत दहशत पसरवणे
या सारखे गुन्हे त्यांचे विरुध्द दाखल असल्याने त्यांचा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे तडीपार प्रस्ताव पोलीस उप- आयुक्त परिमंडळ – ५ पुणे शहर यांचेकडे सादर केला होता.