मोक्का कोर्टात जामीनासाठी बनावट डॉक्टर सर्टिफिकेट दिल्याने एकावर गुन्हा दाखल,


🖕 Click Here

पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली फिर्याद.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

विषेश मोक्का कोर्टात जामीन मिळण्यासाठी डॉक्टराचे बनावट पत्र तयार करून जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करून कोर्टाची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement

हकीकत अशी की २४ जून २०२० रोजी स्पेशल मोक्का कोर्ट, शिवाजीनगर पुणे यांच्या कोर्टात एका आरोपीने कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी,

प्रथमत झालेल्या आजाराचे अनुषंगाने न्यायालयातुन वैद्यकिय कारणास्तव डॉक्टरांचे ऑनको लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे सातारा यांचे लेटर हेडवर,

त्यामध्ये applicant needs to be treated by 04 chemotherapy 3 weekly for 6 cycle depending upon the review of ihc and pet ct scan” असे नमुद करुन बनावट पत्र तयार करुन,

🖕 Click Here
Advertisement

सदरचे पत्र स्पेशल मोक्का कोर्ट, शिवाजीनगर पुणे जामीन मिळणेकरिता सादर करुन, त्याद्वारे जामीन मिळवण्याचा प्रयत्न करुन कोर्टाची फसवणुक केलेली आहे.

पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मुंडे करीत आहेत.

Advertisement
🖕 Click Here