पुणे विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी ; जेष्ठ महिला ताब्यात


🖕 Click Here

Crime branch news : पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी आलेल्या एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असे फिस्किंग बूथमध्ये बसलेल्या सीआयएसएफच्या जवानाना सांगितले. त्यामुळे विमानतळावर तपास यंत्रणांची एकच धावपळ उडाली. अखेर योग्य ती खबरदारी बाळगत सुरक्षितरीत्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोंढव्यात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरोधात एमपीडीए ची कारवाई

नीता प्रकाश कृपलानी (७२, रा. गुडगाव औद्योगिक वसाहत) असे अटक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सीएसआयएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) च्या महिला पोलिस शिपाई दीपाली बबनराव झावरे (३३, रा. लोहगाव) यांनी तक्रार दिली.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी आरोपी महिला नीता कृपलानी या विमानतळावर फ्रिस्किंग बूथ समोर आल्या असता, तेथे उपस्थित सीआयएसएफच्या जवानांकडे बघत ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असे सांगितले. यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला.

🖕 Click Here

भोलावालेसह पाच साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

सीआयएसएफच्या जवानांनी महिलेला ताब्यात घेत तिची झडती घेतली असता ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Advertisement

या ज्येष्ठ महिलेविरोधात खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस.आर. करपे करत आहेत.

🖕 Click Here