वानवडी पोलीस निरीक्षक अत्यंत बेजबाबदार अधिकारी : चित्रा वाघ यांचे वक्तव्य,
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वानवडी पोलीसात दिली भेट.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पूजा चव्हाण यांनी आत्महत्या केलेल्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यावेळी वानवडी पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दीपक लगड यांच्याशी वाघ यांची बाचाबाची झाली. पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. दिपक लगड हे अत्यंत बेजबाबदार अधिकारी आहे.
पोलीस महासंचालक सुधा इतक्या संवेदनशील प्रकरणात बोलत नाहीत. त्यांची तातडीने हकालपट्टी करावी, मागणीच वाघ यांनी केली आहे.
तसेच आरोपी संजय राठोड याला वाचवण्यासाठी कुठल्या थरापर्यंत जाणार आहात, अशी टीकाही वाघ यांनी केली.
पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या बाबतीत बोलताना चित्रा वाघ यांचे विडिओ व्हायरल झाले आहे.