सराईत चोरटा निघाला भंगार विक्रेता,
A scrap dealer :रविवार पेठ बाजारातील दुकाने फोडण्याचा प्रयत्न करणारा सराईत चोरटा निघाला भंगार विक्रेता,
A scrap dealer : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
काही दिवसांपूर्वी पुण्यातील रविवार पेठ मध्यवर्ती भागातील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा प्रकार समोर आला होता.
त्या संदर्भात फरसखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्यातील आरोपींचा फरासखाना पोलीसानी कसोशीने तपास करुन बातमीदार व तांत्रिक बाबींचा अवलंब करुन चोरट्या आरोपींची माहिती घेतली असता.
गुन्ह्यातील आरोपी हा चिखली कडुन कुदळवाडीकडे जाणा-या पुलाजवळील एच.पी. पेट्रोल पंपासमोरील सार्वजनिक रोडवर त्याचे मित्रास भेटण्यास येणार असल्याची बातमी मिळाली
त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन त्यांचे आदेशान्वये माहितीच्या आधारे सदर भागात सापळा रचुन पाहिजे असलेल्या गुन्ह्यातील आरोपी
विकास ऊर्फ विकी ऊर्फ जंगल्या दिलीप कांबळे, (वय २६ रा. फ्लॅट नं. १११०, कोर्ट यार्ड चिखली पुणे.)
यास २६ तारखेला अटक करण्यात आली असुन गुन्ह्यातील आणखीन आरोपींचा व गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहे.
वाचा: अजित पवार, धनंजय मुंडे हाजीर हो : पोलीसांची दिग्गजांना नोटीस
अटकेत असलेला विकास कांबळे याच्यावर पुणे व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलायामध्ये दाखलअसलेल्या गुन्ह्यांची माहिती काढली असता.
त्यावर यापुर्वी अपहरण, शरीरावरील गुन्हे, घरफोडी, चोरी असे एकुण ३२ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.
दाखल गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उप निरीक्षक तेजस्वी पाटील करीत आहेत.
VIDEO पहा : महेश लांडगेंचा राजीनामा ?

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (marine drive police station) अजित पवार, धनंजय मुंडे हाजीर हो