सय्यद नगर परिसरात एकाचा खून,चार जण गंभीर जखमी


🖕 Click Here

पुणे:सय्यदनगर 12 नंबर ए मध्ये राहणारा अजीम शेख या सराईताचा कोयत्याने सपासप वार करून काल संध्याकाळी खून करण्यात आला.किरकोळ कारणावरून मागील दोन दिवसांपासून दोन गटात वाद चालू होता.

सदरील खून हा गुलाम अली नगर गल्ली नंबर 3 येथील सादिक भाई गॅरेज वाले यांच्या गॅरेज जवळ घडला , आपापसात झालेला वाद मिटवण्यासाठी अजीम शेख,पप्पू शेख व इतरांना त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते.

बातचीत दरम्यान वातावरण पेटले व विरोधी गटातील तरुणांनी अजिम वर सपासप वार करून खून केला.

Advertisement

Video 📸 पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा : https://fb.watch/muIIN9ngH-/

🖕 Click Here

पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले असून अनेक आरोपी हे फरार आहे. जर पोलिसांनी वेळीच या विषयाची गंभीर दखल घेतली असती तर आज या भागात खून झाला नसता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच सदरील खून झाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

सध्या हडपसर सय्यद नगर भागात अनेक गुन्हेगार हे मोकाट फिरत असून नागरिकात भीतीचे वातावरण आहे. मोकाट फिरणाऱ्या गुन्हेग रांची वानवडी पोलीस कंबर कसणार का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement
🖕 Click Here