घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक, सोने चांदी जप्त,

By Wanwadi police news : ३२ लाख ५३ हजार ५०० रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत.

By Wanwadi police news : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

पुणे शहरात सध्या चोरी, घरफोडी चे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांना डोळ्यात तेल घालून पाहरा द्यावा लागते आहे.

असाच पाहरा देताना घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार वानवडी पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

वानवडी पोलीसांनी एका वर्षात सलग तीसरी मोठी कामगीरी करुन घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांकडुन गुन्ह्यांची उकल केली आहे.

वाचा : सय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार ?

पुणे शहर व आजुबाजुच्या परिसरात घरफोडी चोरीचे सत्र मोठया प्रमाणावर पुन्हा एकदा सुरु झाले असल्याने

वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नासिर देशमुख व नवनाथ खताळ यांना माहीती मिळाली की शहरात सुरु असलेल्या घरफोडी सत्रामध्ये पुन्हा शिकलकरी टोळीच सक्रीय झाली आहे .

परंतु चोरी करताना खबरदारी घेत असुन सी.सी.टि.व्हि. फुटेज मध्ये न येणे, मोबाईलचा वापर टाळणे,

तसेच चोरी करण्यासाठी वापरलेल्या गाडया वेगवेगळया ठिकाणी सोडणे नियोजित ठिकाणी न थांबता इतर ठिकाणी वाटाघाटी करणे ,

तसेच रात्रीच्या वेळी घरी न येणे पुर्वी केलेल्या चुका टाळण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. त्यावरुन त्या चोरांना धरणे जिकिरीचे होते.

तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

वानवडी पोलीस स्टेशनचा सर्व तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी रात्रीच्यावेळी जावून त्यांचे घरावर सलग तीन दिवस पाळत ठेवली परंतु ते मिळुन आले नाही.

त्यावरुन सदर शिकलकरी आरोपी संदर्भात सुहास बावचे पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५,

व क्रांतीकुमार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शन घेत.

🖕 Click Here

व त्यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक यांनी शिकलकरी गुन्हेगाराबाबत माहीतगार कर्मचारी राजु रासगे, नासीर देशमुख,

नवनाथ खताळ योगेश गायकवाड, महेश कांबळे, अनुप सांगळे यांना पुन्हा वेळ बदलुन सदर आरोपी विरुध्द सापळा रचला.

आरोपी हे पहाटे ६ वाजता आंघोळ करण्याकरीता घरी आले असता पोलिसांनी धरपकड केली,

सराईत गुन्हेगार रविसिंग शामसिंग कल्याणी वय २२ वर्षे रा.सर्वे नंबर ११० कोठारी व्हील शो रुमच्या मागे रामटेकडी हडपसर पुणे,

बिंतुसिंग शामसिंग कल्याणी वय २४, हुकुमसिंग रामसिंग कल्याणी यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांचेकडून आतापर्यंत पुणे शहर, पिंपरी चिंचवड परिसरातील घरफोडी चोरी,

वाहन चोरी, मिळुन एकुण १३ गुन्हे उघड करुन त्यामधील एकुण ३४३ ग्रॅम सोने,

६६४ ग्रॅम चांदी, २६ हजार रुपये रोख ४ चारचाकी वाहने, ३ दुचाकी वाहने असा एकुण ३२ लाख ५३ हजार ५०० रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

यापुर्वी वानवडी पोलीसांनी एका वर्षात आतापर्यंत शिकलकरी गुन्हेगार टोळीकडुन ऑगस्ट २०१९ मध्ये ५१ गुन्हे १ कीलो सोने,

१० कीलो चांदी, वाहने असा १ कोटी रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला होता.

तसेच फेब्रुवारी २०२० मध्ये २१ गुन्हे त्यामध्ये ११० कीलो चांदीचा १ कोटी रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला होता.

जिवंत पेशंट ला वेळेवर ॲंबुलन्स मिळत नाही म्हणून अधिका-याची गाडी

🖕 Click Here

2 thoughts on “घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक, सोने चांदी जप्त,

Comments are closed.