पोलिस आले अन् गेले चौघां चोरट्यांनी मात्र सुरक्षा रक्षकाला चोपले.

पुणे : येरवडा येथील विसर्जन घाटावरील नदी सुधार प्रकल्पातील लोखंडी पाइप चोरून नेणाऱ्यांना हटकले व सुरक्षा रक्षकाने पोलिसांना बोलावले.

पोलीसांना पाहून  ते पळून गेले. पोलिस निघून गेल्यावर पुन्हा येऊन चौघांनी सुरक्षा रक्षकाला बांबूने मारहाण केली. याबाबत विनोद ज्ञानोबा वाघंबरे (वय ३४, रा. चिखली, पिंपरी-चिंचवड) यांनी येरवडा ठाण्यात फिर्याद दिली.

हा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला. अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे गणपती विसर्जन घाट येथे रात्रपाळीला सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. त्यावेळी दोन चोरटे मुठा नदी सुधार प्रकल्प येथे आले. त्यांनी प्रकल्पावरील लोखंडी प्रॉमस (लोखंडी स्पोर्ट पाइप) घेऊन जाऊ लागले.

🖕 Click Here

तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना हटकले असता, ते दमबाजी करू लागले, फिर्यादी यांनी पोलिसांना “बोलावले, पोलिस येईपर्यंत चोरटे पळून गेले. चोरटे पळून गेल्याने पोलिस निघून गेले. त्यानंतर ते दोघे चोरटे व दोन साथीदार पहाटे पुन्हा तेथे आले. त्यांनी फिर्यादी व त्यांचे सहकारी अक्षय गजभिव यांना बांबूने मारहाण करून जखमी केले.

🖕 Click Here