देशी पिस्तूल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केले अटक
देशी पिस्तूल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केले अटक (kondhwa police station)

Police news 24 : kondhwa police station :कोंढवा ठाण्यातील पोलिस हद्दीत गस्त घालत असताना कोंढवा खुर्द
येथील प्रतिभाताई शाळेसमोरील मल्हार चौकात एक इसम पिस्टल व जिवंत काडतुस घेवुन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून साजिद रेहमान सय्यद 25 वर्षीय
या संशयित इसमाला एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसासह अटक करण्यात आले.
हेपण वाचा: एस.टी मधून प्रवास करणाऱ्या महिलेचे सोन्याचे नेकलेस चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे शहरात विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुशंगाने सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2019 रोजी
पोलीस शिपाई आदर्श चव्हाण व उमेश शेलार हे हद्दीत गस्त घालत असताना,
पोलीस शिपाई आदर्श चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारामार्फत कोंढवा खुर्द येथे प्रतिभाताई शाळे समोरील मल्हार चौकात,
एक इसम पिस्टल व जिवंत काडतुस घेवुन येणार असल्याची खबर मिळाली. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे,
व पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांना कळविले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे,
पोलीस उप निरीक्षक संतोष शिंदे, तपास पथकातील पोलीस कर्मचारी यांनी बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे
सदर ठिकाणी सापळा रचुन संशयित इसम साजिद रेहमान सय्यद
(वय 25, रा.राजीव गांधी नगर झोपडपट्टी,साळुखे विहार , मुळ गावबुराहपुर , उत्तरप्रदेश)
यास शिताफीने ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळुन आले.
सदर पकडलेल्या आरोपी विरूध्द कोंढवा पोलीस ठान्याय 784 /19 आर्म अँक्ट 3(25), 37(1) व 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडिओ गेम व लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा
साजिद रेहमान सय्यदकडे मिळून आलेले देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस त्याने कशासाठी आणले कुठून उपलब्ध झाले,
त्याचा कुठल्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का याचा पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी,अप्पर पो.आयुक्त पु.प्र.विभाग सुनिल फुलारी, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 5 सुहास बावचे,
सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे सुनील कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे,
पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे,
पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस शिपाई आदर्श चव्हाण, उमेश शेलार व तपास पथकातील पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी:राष्ट्रवादी

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Market yard police News) लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
Pingback: (police arrest kidnapper)अपहरण करून खंडणी उकळणा-यास केले जेरबंद