एशियन पेंट कंपनीच्या नावाचा वापर करत बनावट पेंट विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल,

Fake paint : शुभम सेल अँड केमीकलस डिस्ट्रीबिटरचा प्रकार.

Fake paint : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

एशियन पेंट कंपनीच्या नावाचा वापर करत एकाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल, कॉपीराइट व इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद प्रसाद वय-२४ रा.नवी दिल्ली यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने,संजय रामप्रित सहाणी,वय-३७ वर्षे,रा. तपोधाम,वारजे याला अटक करण्यात आली आहे.

वाचा > पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असताना आरोपींना अटक,

शुभम सेल अँड केमीकलस डिस्ट्रीबिटर गुलमोहर प्लॉट नं.३८,शॉप नं.१,कर्वेनगर, पुणे ,

या दुकानात बनावट पेंन्टचा कच्चा माल पुरवुन,संगनमत करून एशियन पेंट कंपनी व इतर कपंनीच्या नावाचा वापर करुन,

🖕 Click Here

मुळ कंपनीच्या परवानगी शिवाय वेग-वेगळया प्रकारचे बनावट पेंट हे जांभुळवाडी आंबेगांव येथील पत्र्याच्या गोडावुन मध्ये तयार केले,

आरोपीने स्वतःच्या दुकाना मध्ये पेंट विक्रीकरीता ठेवुन,कॉपीराईटच्या स्वामीत्वाचे मुळ हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास वारजे पोलीस ठाणे करत आहे.

वाचा > देहविक्रय करणाऱ्या ९९ टक्के स्त्रियांना हवी आहे पर्यायी रोजगार संधी

🖕 Click Here

One thought on “एशियन पेंट कंपनीच्या नावाचा वापर करत बनावट पेंट विकल्या प्रकरणी गुन्हा दाखल,

Comments are closed.