पुण्यातील’ डॉन नंबर वन ‘ मिरज पोलिसांच्या ताब्यात
(Pune’s ‘Don Number One ) मिरज : मिरज मधील सर्वोदय गणेशोत्सव मंडळाच्या ‘ श्रीं’च्या आगमन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करून कानठळ्या बसविणाऱ्या ‘ डॉन नंबर वन ‘ या नावाने प्रसिद्ध असलेली डीजे यंत्रणा मिरज शहर पोलिसांनी जप्त केली आहे .
यंदा निर्बंध हटविल्याने गणेशोत्सव मंडळे जोशात आहेत . पोलिसांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतरही मिरजेत आगमन मिरवणुकीत डीजेचा जोरदार दणदणाट करण्यात आला होता .
याप्रकरणी पोलिसांनी सात गणेश मंडळांवर व डीजे मालकांवर ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत . गुन्हा दाखल झालेल्या डीजे यंत्रणा जप्त करण्यात येत आहेत.
सर्वोदय मंडळाच्या मिरवणुकीत पुण्याच्या डॉन नंबर वन या डीजेने ६० पर्यंत डेसिबलपर्यंत परवानगी असताना ११३ ते १२३ डेसिबल एवढ्या प्रचंड आवाजाने डीजे वाजवून सर्वांच्या कानठळ्या बसविल्या होत्या .
दुप्पट आवाज करीत नियमाचे उल्लंघन केल्याचे ध्वनिमापक यंत्राद्वारे तपासणीत आढळले . याबाबत निर्देश देऊनही आवाज कमी न केल्याने पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे यांनी कारवाई केली आहे .