तलाक दिलेल्या पतीवर पत्नीने केला चाकू हल्ला
Crime branch news: टीव्ही सिरीयल प्रमाणे एक प्रसंग पिसोळीत घडला ; नवऱ्याने तलाक दिल्यानंतर ही सोडलेल्या पत्नीवर नजर ठेवून होता.
हि कोनाला भेटते काय करते सतत लक्ष देत असल्याने सोडलेल्या पत्नीचे सय्यम सुटले व तीने मी या तरुणाबरोबर लग्न करणार असल्याचे सांगून घरातील चाकूने पूर्वाश्रमीच्या पतीवर वार करून जखमी केले .
याप्रकरणी एका २८ वर्षांच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
त्यावरून पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे . ही घटना पिसोळीमधील एका सोसायटीत २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली .
अधिक माहितीनुसार , कोंढवा येथे राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीला एक महिन्यापूर्वी तलाक दिला आहे . ही महिला पिसोळी येथील एका सोसायटीत राहते .
तलाक दिला असला तरी तो आपल्या पत्नीवर नजर ठेवून होता . तिला भेटायला एक तरुण येत असल्याची माहिती त्याला मिळाली .