अपहरण करून खंडणी उकळणा-यास पोलिसांनी केले जेरबंद

Police Arrest Kidnapper : अपहरण करून खंडणी उकळणा-यास पोलिसांनी केले जेरबंद

pune-police-arrest-kidnapper-and-colect-14750000-cror-rupees

Police Arrest Kidnapper : Police News 24:पुणे- १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता कांतिलाल गणात्रा (वय ६५, रा. मार्केटयाड)

हे तळेनगर सोसायटी येथील गंगाधाम रोडवरील सरकारी गोडाऊन जवळून जात असताना
अनोळखी तीन इसमांनी कांतिलाल गणात्रा यांचे अपहरण केले ,

त्यांचे अपहरण करून चारचाकी वाहनात कोंबून तेथून पळ काढला व त्यांचा मुलगा
महेश गणात्रा यास फोन करून धमकी दिली कि

जर २ कोटी नाही दिलेतर तुझ्या वडिलांचा खुन करू , या संदर्भात महेश गणात्रा यांनी पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला,

परिमंडळ-५ च्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शाखे कडील अधिकारी व पोलिसांच्या वेगवेगळ्या टिम करून अपहरणकर्तेचा शोध घेण्याचे चालू केले.

अपहरणकर्त्यांनी सदरची रक्कम चांदनी चौक येथे मागविली महेश गणात्रा हे दीड कोटी रक्कम घेऊन ठरलेल्ल्या ठिकाणी पोहोचले व अपहरणकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे ठेवण्यात आले ,

सदरील रक्कम घेण्यासाठी आरोपी आले व रक्कम घेऊन पसार होत असताना मोटारसायकलवर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला .

video पाहण्यासाठी क्लिक करा

आरोपी सुजित गुजर (वय २४, रा. उरूळी देवाची ता. हवेली,जि. पुणे), ओकार वाल्हेकर (वय २०, रा. उरूळी देवाची ता. हवेली, जि.पुणे)

याना पकडून तपास केल्यानंतर त्यांचा मुख्य सुत्रधार रा. अजय साबळे, (रा. मु.पो. वडकी नाला, ता. हवेली, जि. पुणे)

त्याचे इतर साथीदार अमित जगताप (रा. मु.पो.उरूळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) यांनी सदर रक्कम फॉच्यूनर गाडीतून नेल्याचे कबूल केले आहे.

🖕 Click Here

त्यानुसार गुन्हे शाखेकडील युनिट ५ व पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी यांनी उरूळी देवाची व वडकी नाला पिंजून काढला

व अमित जगताप यांनी गुन्ह्यात वापरलेली फॉच्यूनर कार व खंडणीत स्विकारलेले रोख १,४७,५०,०००/- ही रक्कम हस्तगत केली .

तसेच गुन्ह्यात वापरलेली फॉर्म्युनर कार, वरील रोख रक्कम व इतर चिजवस्त असे एकूण १,७५,२०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरील कारवाई पोलिस आयुक्त, सहा. पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे, पूर्व विभागचे अप्पर पोलिस आयुक्त सुनिल फुलारी, गुन्हेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे,

परिमंडळ-५ चे पोलिस उपायुक्त सुहास बावचे,गुन्हेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग सुनिल कलगुटकर,

व सहायक पोलिस आयुक्त प्रतिबंध विभागचे शिवाजी पवार, प्रॉसिक्युशन विभागचे सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी,

मार्केटयार्ड पोलिस स्टेशनातील पोलिस अधिकारी व प्रभारी अधिकारी व तपास पथकातील अधिकारी व कर्मचारीसह

गुन्हे शाखेकडील अं.प.वि.प. व खंडणी पश्चिमचे प्रभारी अधिकारी राजेंद्र मोहिते व अधिकारी व कर्मचारी व अं.प.वि.प. पूर्वचे प्रभारी अधिकारी विजय टिकोळे

आणि अधिकारी व कर्मचारी आणि युनिट-५ कडील प्रभारी अधिकारी दत्ता चव्हाण आणि अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

मागील बातमी :देशी पिस्तूल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केले अटक

🖕 Click Here

2 thoughts on “अपहरण करून खंडणी उकळणा-यास पोलिसांनी केले जेरबंद

Comments are closed.