घरफोडी करणाऱ्याला चोवीस तासांत अटक,

thief-arrested-for-Withdraw money from bank
संग्रहित फोटो

४ लाख ६० हजारांचे सोने हस्तगत.

पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :‌ येरवडा भागामध्ये धनत्रयोदशी या दिवशी घरामध्ये पुजेसाठी देवासमोर ठेवलेले ११ तोळे सोने,

मोबाईल व रोख रक्कम काही चोरटयांनी घरफोडी करुन चोरून नेली होती त्याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील अंमलदार गणपत थिकोळे, पोलीस नाईक नवनाथ मोहिते व राहुल परदेशी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली,

सुक्या नावाच्या व्यक्तीने सदरची चोरी केली आहे. सदरची माहिती वरिष्ठांना कळवत अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे, वय-१८ राहणार स नं १४ जयजवान नगर येरवडा पुणे,

🖕 Click Here

व एक विधीसंघर्षित बालक यास गेनबा शाळा कंपाऊंड येरवडा या ठिकाणाहून ताब्यात घेवून दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्याच्याकडून गुन्हयातील चोरीस गेलेले दागिन्यापैकी ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने व २ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत.

दाखल गुन्हयाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत. सदरील कामगिरी राहुल परदेशी, सुनिल सकट ,

समीर भोरडे, अमजद शेख, अनिल शिंदे, गणेश वाघ, तेजस पवार, किरण घुटे यांनी केलेली आहे.

🖕 Click Here