तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल
Triple talaq : तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल

Police news 24 :Triple talaq पत्नीचा कौटुंबिक हिंसाचार करून तिला व्यवस्थित न नांदवता तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात सुधारित कायद्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या नवीन कायद्यानुसार दाखल झालेला हा पुण्यातील प्रथमच गुन्हा असल्याचे हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी सांगितले.
जावेद नासीर शेख (रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
पतीने पत्नीला नोटीस पाठवून त्यामध्ये तीन वेळा तलाक तलाक तलाक असा उल्लेख केला होता.या प्रकरणी मांजरी येथे राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली.
फिर्यादी महिलेचा जावेदबरोबर जानेवारी २०१८ मध्ये विवाह झाला होता. तिने पती व सासरच्या लोकांविरुध्द सप्टेंबर १८ मध्ये कौटुंबिक हिसाचारांतर्गत तक्रार दाखल केली होती.
सदरील प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. मागील दोन वर्षांपासून ती मांजरी येथे माहेरी राहत आहे.
दरम्यान ९ ऑक्टोबर रोजी जावेदने तिला नोटीस पाठवून, मैं तुमको तलाक देता हूँ’ असा तीन वेळा उच्चार करून विवाह संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे त्याच्यावर अॅवॉलिशयन ऑफ ट्रीपल तलाक अंडर द मुस्लिम वूमन प्रोटेक्शन ऑफ राइट ऑन मॅरेज अॅक्ट २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील बातमी: अॅक्टीव्हाच्या डिक्कीतून ४,५०,००० रुपये गुल

Police News 24 :हडपसर पोलिस स्टेशन च्या हद्दीतील रविदर्शन येथील
सारस्वत बँके समोर दिनांक २२ /१०/ २०१९ रोजी दुपारी .१२/४५ वाजता अॅक्टीव्हा दुचाकी ही पार्क केली होती
दुचाकीतील डिक्की मध्ये फिर्यादी महिला हया ते काम करीत असलेल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीची
रोख रक्कम ४,५०,००० रुपये व बँकेचे दोन पासबुक डीकीला लॉक करुन ठेवले होते ,
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदरचा ऐवज चोरी करून नेला असल्याची तक्रार फिर्यादी महिलेने
हडपसर पोलिस स्टेशन येथे केली असून पोलिस उपनिरीक्षक जाधव हे पुढील तपास करत आहे.
मागील बातमी : एस.टी मधून प्रवास करणाऱ्या महिलेचे सोन्याचे नेकलेस चोरी
Police News 24 :कृष्णा डांगरे,वय-२३ वर्षे,रा.नवी पेठ,सोलापुर हे पुणे ते सोलापुर एस.टी.ने प्रवास करीत असताना,
यांच्याआई जवळ ठेवण्यात आलेल्या पर्स मधून ३०,०००/-रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस चोरी करण्यात आला.
सदरील प्रकार हा दि.२२/१०/२०१९ रोजी दुपारी दीड ते दोन च्या दरम्यान शेवाळवाडी बाजार समिती समोर
एस.टी.आली असताना झाला असल्याचे फिर्यादी महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे.
या बद्दल हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कोणाला हि अटक करण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Maulana arrested) विनयभंगाच्या गून्ह्यातील फरार मोलवीची जेलमध्ये रवानगी