पिंपरी चिंचवड हद्दीत टोइंग टेम्पो चालक व वाहतुक पोलीस करताहेत नागरिकांची लुटमार

नो पार्किंग ची पावती 236 रुपयाची तर मागणी 5000 रुपयांची.

Crime branch news : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एक टेंडर निघाले होते निर्मला ऑटो केअर सेंटर याला ते टेंडर मिळाले होते व त्याची मुदत ही 24/1/2023 रोजी संपली होती त्या टेंडर चे उद्देश हे होते की वाहतुक पोलिसांच्या मदतीने नोपार्कींग मधिल वाहने उचलने व त्यांना २३६ रूपयाचे दंड आकारणे,यासाठी टेंपो, लेबर व इतर खर्च हे ठेकेदाराने उचलने व बदल्यात पिंपरी मनपा त्या ठेकेदाराला ठराविक पैसे देईल. पण याचा गैरफायदा घेणारे यात शामिल झाले व त्यांनी नागरिकांची लुट चालु केली.

टोविंग वरील कर्मचारी आणि ट्राफिक वार्डन हे नागरिकांना लायसन्स आहे का ? आरसी कार्ड आहे का? गाडीचा इन्शुरन्स आहे का ? मिरर आहे का ? हेल्मेट आहे का ? पिऊसी आहे का? अशा अनेक कागदपत्रांची मागणी थेट टोविंग करणारे मुजोर कर्मचारी नागरिकांकडे करत आहेत. हे ऐकल्यानंतर नागरिक त्यांना कागदपत्र देखील दाखवत आहेत परंतु त्यामधील एखादा कागदपत्र नसेल तर त्याचा लायसन्स नसेल तर दंड 5000 रु, इन्शुरन्स नसेल तर याचा दंड 2000 रु, मिरर नसेल तर 500 रु, पियुसी नसेल तर 500रु असे वेगवेगळे दंड त्यांना सांगून नागरिकांना भीती घालण्याचा काम सध्या त्या ठिकाणी सुरू आहे. एक माणूस त्यांचा मध्यस्थी म्हणून पडतो आणि 1000,2000 रुपयात सेटलमेंट करतो.

टोइंगवरील कर्मचाऱ्याना गाडीचे कागदपत्र तपासण्याचा अधिकार दिला कोणी ?

🖕 Click Here

236 रुपयाची पावती असून दंडाची रक्कम पाच हजारांपासून सुरुवात केली जाते जर एखादा बकरा फसला तर  सेटलमेंट करून दंडाची रक्कम  इतरांच्या ऑनलाईन अकाउंट वर घेतली जाते असे करून नागरिकांना फसवले जात असल्याचा प्रकार हिंजवडी ट्राफिक डिव्हिजन मध्ये राजरोसपणे सुरू आहे. नावापुरते 40 पावत्या ह्या 236 रुपयाच्या केल्या जातात,तर दिवसभरात 100 पेक्षा जास्त गाड्या एका डीव्हिजन मध्ये उचलले जात असून दर रोज लाखो रुपयाची काळी कमाई टोइंग टेम्पो चालक व वाहतुक पोलीस करत आहे.

हिंजवडी, वाकड, निगडी,भोसरी या चार ठिकाणी अभिनव रणदिवे याचे टेम्पो लागले असून याच टेम्पोच्या पैशाच्या वादावरून त्याच्या भाच्याने त्याच्यावर काही दिवसांपूर्वी कुरहाडीने वार केले होते , दर रोज बेकायेशीररित्या लाखो रुपयांची वसुली होत असल्यामुळेच हे प्रकरण झाले होते. या रणदिवेला झटपट श्रीमंत होण्याची हौस सुटली असून त्याच्या हवास्या पोटी नागरिकांना भिक लागण्याची वेळ आली आहे , या रणदिवेच्या हिंजवडी, वाकड, निगडी,भोसरी या चार ठिकाणी इतरांच्या नावाने वाहने लागली असून त्यांचे वाहन नंबर MH 12 -4352 ,MH 12 -5831 ,MH 12 -4458 ,MH 12 -4490 असून सदरील वाहनाद्वारे नागरीकांची लुट चालू असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

पैश्याला हपापलेल्याची वाहने जमा करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तसेच टेंडर धारक निर्मला ऑटो केअर सेंटर याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

🖕 Click Here