बनावट राजीनामे तयार केल्याप्रकरणी शाळेतील महिला उपाध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल,

Female vice president : पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल मधील प्रकार.

Female vice president : पोलीस न्यूज 24 : पुणे शहरात कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही.

आज थेट बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

याबाबत आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

असाच एक फसवणूकीचा प्रकार पुण्यातील आळंदी रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घडला आहे.

या संदर्भात परमेश्वर सोळुंके,वय-५२ रा.पैठण रोड,औरंगाबाद यांनी विश्रांतीवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाचा : बहिणीच्या मुलीलाच मावशी दाखवत होते पॉर्न व्हिडिओ

त्या फिर्यादीवरून शाळेतील संस्थेच्या महिला उपअध्यक्षा व इतर दोन महिला आणखीन चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे पुणे-आळंदी रोड येथील इंग्लिश स्कुल मध्ये सेक्रेटरी म्हणुन काम पाहत आहे.

यात महिला उपाअध्यक्षा हिने सहायक धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेचे अध्यक्ष,सचिव,सहसचिव,

🖕 Click Here

खजिनदार व इतर सदस्यांचे कुठल्याही प्रकारच्या सह्या नसतांना खोटे व बनावट राजीनामे व दस्ताऐवज तयार करुन सहायक धर्मादाय आयुक्त पुणे कार्यालयात २३ जानेवारी २०१७ रोजी अर्ज दाखल करुन

संस्थेतुन फिर्यादी व इतर सदस्यांची नावे वगळुन त्याठिकाणी आरोपींनी खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे

बनावट व खोट्या नोटीसी तसेच ठराव पास करुन खोटी बनावट कागदपत्रे धर्मदाय कार्यालयात सादर करुन संगनमताने फिर्यादी व त्यांच्या सदस्यांची फसवणुक केली.

VIDEO पहा : sanvidhan चा अपमान केल्या प्रकरणी सिने अभिनेता Pravin Tarde याने मागितली माफी

तसेच सन २०१३ मध्ये शाळेचे बैकेचे खाते चालु असताना,सदर बँकेत २००७ पुर्वीच्या संदस्यांच्या खोटा ठराव बँकेत देवुन,बँकेची दिशाभुल करुन,खोटे कागदपत्र सादर करुन, खाते उघडुन २५.००,०००/ रुपयांचा अपहार केला.


सदरील बाब न्यू इंग्लिश स्कूल संस्थेच्या निर्दशनास येताच सदरील प्रकरणा बाबतीत फिर्याद देण्यात आली आहे.

याबाबत शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक(गुन्हे) रविंद्र कदम करीत आहेत.

🖕 Click Here

One thought on “बनावट राजीनामे तयार केल्याप्रकरणी शाळेतील महिला उपाध्यक्षा विरोधात गुन्हा दाखल,

Comments are closed.