चोरी केलेले १ लाख रुपयांची तांब्याची भांडी / प्लेटा विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन जप्त.


🖕 Click Here

Crime Branch News: pune: रिया एंन्टरप्रायझेस, संनं ४४ / २ / २ निंबाळकर वस्ती, गुजरवाडी निंबाळकर वाडी रोड, कात्रज, पुणे या तांब्याची भांडी बनविणाऱ्या कंपनीचे पत्र्याचे शेड उचकटुन कोणीतरी अज्ञात इसमाने कंपनीतील २,००,०००/- रुपयांची ताब्यांची भांडी चोरुन नेली म्हणुन तक्रारदार यांनी तक्रार दीली होती, दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हे शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा विधीसंघर्षीत बालक व त्याच्या इतर साथीदारांनी मिळुन केला आहे अशी खात्रीशीर बातमी पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर विधीसंघर्षीत बालकाचा शोध घेवुन त्यास निगडी येथुन ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या तांब्याच्या भांडयांपैकी १,००,०००/- रुपये किंमतीची सुमारे ७० किलो वजनाची तांब्याची भांडी जप्त केली असुन त्याच्याकडे गुन्हयाचा तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली आहे.

तरी बालकाचे इतर साथीदारांचा शोध चालु असुन त्यांच्याकडुन उर्वरीत तांब्याची भांडी व प्लेटा जप्त करणे आहे.

🖕 Click Here
Advertisement

सदरची कारवाई श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, नारायण शिरगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, शैलेश साठे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

🖕 Click Here