पासोडया विठोबा मंदिरात चोरी करणारा गजाआड.
पासोडया विठोबा मंदिरात चोरी करणारा गजाआड.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुण्यातील सुप्रसिद्ध असलेले पासोडया विठोबा मंदिरातील दान पेटीतील रक्कम चोरी
झाल्याची घटना १४ जूनच्या सकाळी उघडकीस आली होती. त्याची फिर्याद कमल पवार,वय-७४,रा.४७९,तापकीर गल्ली पुणे
यांनी फरसखाना पोलीस ठाण्यात दिली होती त्याची दखल घेत
फरसखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याचा तपास सुरू असताना एका विधीसंघर्षीत बालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे पासोडया विठोबा मंदिर,
४३८,कसबा पेठ, पुणे येथे यातील फिर्यादी ह्या सेवा करीत असलेल्या,४३८, कसबा पेठ, पुणे येथील पासोडया विठोबा मंदिर
हे कुलुप लावुन बंद असताना विधीसंघर्षीत बालक याने पासोडया विठोबा मंदिराचे कडी-कोयंडा कशाचे तरी सहाय्याने उचकटुन,