पोलीस दलात खळबळ, पोलीस कर्मचाऱ्यांना ५ लाखांचा दंड.
पोलीस दलात खळबळ, पोलीस कर्मचाऱ्यांना ५ लाखांचा दंड.
पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरातील पोलीसांकडून पोलीसांच्या अब्रुचे लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. काहि

ठिकाणी पोलीस गुन्हेगारांशी संगनमत करुन कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांच्या रॅलीत सहभागी होतानाचे प्रकार ताजे
असतानाच पुण्यातील एका सहाय्यक पोलिस आयुक्ता विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर अनेक पोलीस कर्मचारी व
अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले असल्याने कुंपणच शेत खात आहे.? असाच एक प्रकार पुण्यातील गुन्हे शाखेत ५ दिवस
बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याने न्यायालयाने दखल घेतल्याने पोलीस यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.चोरीप्रकरणात
बेकायदेशीररित्या ५ दिवस डांबून ठेवल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्याकडून ५ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात
आले आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी हे आदेश दिले आहेत. २०१२ मध्ये ही घटना घडली होती.
सध्या एक कर्मचारी दत्तवाडी पोलिस ठाण्यात तर एकजण मुख्यालयात नेमणुकीस आहेत. सहायक फौजदार रमेश वाघमारे
(सध्या नेमणूक मुख्यालय) आणि पोलिस नाईक सुधीर घोटकुले (सध्या नेमणूक दत्तवाडी पोलिस ठाणे) अशी दोन कर्मचार्यांची
नावे आहेत.वाघमारे आणि सुधीर घोटकुले हे २०१२ मध्ये गुन्हे शाखेच्या युनिट दोन मध्ये नेमणुकीस होते. त्यांनी वाहन चोरीत
सागर उभे यांना पकडले. तसेच त्याच्याकडून दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले व दुचाकी जप्त देखील केल्या.
परंतु,तपासादरम्यान सागर उभे यांना पाच दिवस (२५ ते ३० जानेवारी ठेवले.याप्रकरणी सागर उभे यांनी (७ जानेवारी २०१४)
उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.उच्च न्यायालयाने पुण्यातील जिल्हा न्यायालयाला चौकशी करण्याचे आदेश दिले
होते. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चौकशी केली.याप्रकरणी केलेल्या बाबींचे उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष
काढून(२०१२) बेकादेशीर डांबून मार्गदर्शक तत्वामधील निर्देशीत उच्च न्यायालयाला अहवाल सादर केला.अहवालावरुन उच्च
न्यायालयाने सागर उभे यांना बेकायदा डांबून ठेवल्याचा निष्कर्ष कायम करुन उभे यांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई
देण्याचा आदेश दिले. त्यानुसार उभे यांच्या पत्नीच्या खात्यात ही रक्कम अदा केली गेली.

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822