मित्राचा गुप्तांग कापून खून करणाऱ्या कोंढव्यातील तरुणाला जन्मठेपेची शिक्षा


पुणे: प्रेयसीसोबत फिरतो म्हणून तरुणाला राग आला आणि त्याने चाकूने सपासप वार करत त्याच्या मित्राची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे त्याचे शीर धडावेगळे केले आणि पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुणे सत्र न्यायालयाने आरोपी तरुणाला एक लाख रुपये दंड आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , निजाम असगर हाश्मी ( वय 19 वर्ष राहणार इंदिरानगर बिबबेवाडी ) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव असून पुण्यातील कोंढवा इथे 19 जून 2018 रोजी उमेश भीमराव इंगळे नावाच्या एका तरुणाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेला होता. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि त्यानंतर निजाम याला अटक करण्यात आली.

👉 महिला सफाई कर्मचारीचा विनयभंग; महापालिकेचे आरोग्य निरीक्षक, ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल.

सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केलेला असून निजाम याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते आणि ही उमेश देखील या तरुणीसोबतच फिरत असायचा त्यावरून माझ्या प्रेयसी सोबत तू का फिरतो तिच्यासोबत लगट का करतो , असे म्हणत निजाम याने उमेशसोबत वाद सुरू केलेला होता.


घटना घडली त्यादिवशी निजाम याने शीरखुर्मा पिण्याच्या ब बहण्याने इंगळे याला बाहेर घेऊन जात त्यानंतर चाकूने त्याच्यावर वार करत त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने चक्क त्याचे गुप्तांग कापून पिशवीत टाकले आणि ती पिशवी स्वारगेट येथील एका तलावात फेकून दिली.

🖕 Click Here

👉 मराठी/हिंदी न्यूज चॅनेल सजग नागरिक टाइम्स शी व्हाट्सएपवर कनेक्ट व्हा आणि हेल्थ, वेल्थ, क्राईम, राजकारण जगताशी संबंधित ठळक बातम्या ऑनलाईन ऑफर ची महिती मिळवा.

पिशवीमध्ये इंगळे यांचा मोबाईल पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्यानंतर तब्बल 24 साक्षीदार तपासल्यानंतर न्यायालयाने ही शिक्षा ठोठावलेली आहे .

🖕 Click Here