व्हॉट्सअपव्दारे मटका घेणा-या महिलेस पोलीसांनी घेतले ताब्यात
Satta Matka :व्हॉट्सअपव्दारे मटका घेणा-या महिलेस पोलीसांनी घेतले ताब्यात,

Satta Matka : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : पुणे शहरात कधी कोणी कशी शक्कल लढवून काय करतील याचा काहीच नेम नाही.
पुणे शहरात सद्ध्या लाॅकडाउन असल्याने सगळीकडे सुसुकाट आहे. मात्र मटक्याचा धंदा जोमात.
रस्त्यावर उभे राहून अवैधरित्यामटका घेतले की मग काहीच खैर नाही पोलीस कारवाई करतील.
मग काय तर पुण्यातील एका महिलेने थेट व्हॉट्सअपव्दारे मटक्याचा धंदा चालू केल्याने पोलीस ही चक्रावले आहेत.
पुण्यातील एका अॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस विरोधात ४२० चा गुन्हा दाखल,
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या अंकीत ताडीवाला चौकीचे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक अमोल काळे,
निरीक्षक एस ए माचानवाड, महिला पोलिस शिपाई भोकसे असे ताडीवाला पोलीस चौकीचे
हाद्दीत पायी पेट्रोलींग करीत असताना काळे यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली (जगदीश सायकल स्मार्टमागे भाजी मार्केट रोड १३ ताडीवाला रोड पुणे)
येथे एक महिला मोबाईल फोनव्दारे व्हॉट्अप वरती मटका घेत असल्याची खात्रीशीर बातमी
मिळाल्याने सदरची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस ठाणे यांना सांगितली असता त्यांनी सदर बातमीची शहानिशा करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
सदरील ठिकाणी छापा घातला असता छाप्या दरम्यान मोबाईवरुन व्हॉट्रसअप वरती अवैध्यरित्या मटका घेत असणा-या महिलेस माहिला पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.
त्या महिलेला मालका संदर्भात विचारले असता पठाण भाऊ कडे काम करत असल्याचे पोलिसांना सांगितले.
महिलेकडे एकुण-५३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल (पैसे व जुगारीचे साहित्य ) मिळुन आल्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिस्टल व जिवंत काडतुस विनापरवाना बाळगणारे कटटा गँग चे गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (Emergency services) वैद्यकीय उपचार व अत्यावश्यक सेवेकरीता शहरात ऑटो रिक्षा.
Pingback: (online e pass) ऑनलाईन ई-पास काढुन देणाऱ्या भांमट्यावर पोलिसांची कारवाई