निष्काळजीपणाने काम करणारे २ पोलीस निलंबित


🖕 Click Here

2 police suspended :अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळेनी केले २ पोलीस निलंबित

2-police-suspended-for-negligence

2 police suspended :पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : सरकारी कर्मचारी बेजबाबदारपणे वागत असल्याचे आपण पाहताच असतो.

परंतु वरिष्ठांच्या निर्दशनास आल्यास त्यांची मात्र काही खैर नसते.

वरिष्ठांची रोखठोक भुमिका असली की झटपट निर्णय आणि कारवाई होताना दिसते.असाच एक प्रकार समोर आला आहे.

Advertisement

बेजबाबदारपणे वागल्या प्रकरणी पुणे शहर अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी २ लिपीक पोलिसांना निलंबित केले आहे.

पुण्यातील ट्राफिक पोलीसालाच ५ हजारांचा दंड

कोरोनाचे सावट असताना पोलीस रस्त्यावर गस्त घालत असताना कार्यालयातील लिपिक निष्काळजीपणाने कर्तव्य पार पाडत असल्याचे निदर्शनास येताच वरिष्ठश्रेणी लिपिक सतीश मुरलीधर सातपुते आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक आकाश रामचंद्र शिंदे या दोघांनाही अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.

Advertisement

कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले होते. त्यासाठी पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी दिवस-रात्र रस्त्यावर बंदोबस्ताचे काम काज करत होते.

🖕 Click Here

तसेच आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक कर्तव्यावर असलेल्या १० हजार २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर १०८ पोलीसांचा मृत्यू झाला‌ असताना कार्यालयात काम करणारे लिपिक मात्र त्यांना सांगितलेल्या कामात हलगर्जीपणा,

Advertisement

बेफिकीरपणा, बेजबाबदारपणा, कर्तव्यात कसूरी करत होते.

आपल्याकडे असलेली कामे प्रलंबित असताना सुद्धा ते तीन दिवस कोणालाही काही न सांगता गैरहजर राहिले. तसेच २३ जुलैपासून विनापरवाना गैरहजर होते.

तेव्हा प्राथमिक चौकशी केली असता त्यात ते कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्याने त्या दोघांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली .

Advertisement

घरगुती गॅस सिलेंडर विक्रीत एजन्सी चालकांची मनमानी , प्रत्येक ग्राहकांकडून 10 ते 20 रुपये एक्स्ट्रा वसूल

🖕 Click Here