अजित पवार, धनंजय मुंडे हाजीर हो : पोलीसांची दिग्गजांना नोटीस,
Marine drive police station :मरीन ड्राईव पोलीसांच्या दिग्गजांना नोटीसा,
Marine drive police station : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील,
खासदार सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, शिवसेना नेते सचिन अहिर यांच्यासह ११ जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
या सर्व नेत्यांनी २०१८ मध्ये मुंबई मंत्रालयासमोर तत्कालीन भाजप सरकारविरोधात आंदोलन केलं होतं.
यानंतर पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.
यामुळे सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
Pingback: (mobile chori news) खिशातील मोबाईल चोरत चोरटे झाले पसार,
Pingback: (A scrap dealer) दुकाने फोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा निघाला भंगार विक्रेता