गावठी कट्टा बाळगणा-या गुन्हेगाराला केले जेरबंद,
Gavthi pistol :समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Gavthi pistol : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
पुणे शहरात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.
समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक साहील शेख यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,
आंबेडकर कॉलेजच्या चौकाजवळ एक इसम अंगामध्ये भगव्या रंगाचा हाफ टि शर्ट व काळ्या रंगाची ट्रक पँट घातलेला एकजण आंबेडकर कॉलेजच्या गेट शेजारील मांगीरबाबा मंदीराच्या मागे,
नानापेठ पुणे येथे थांबलेला असुन, त्याच्या जवळ कमरेला पिस्तोल आहे.
त्यास ताब्यात घेवुन त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव मुनाफ रियाज पठाण वय. २३ वर्षे, धंदा.
बुक बायडींग रा. ३००, नानापेठ, डोके तालीम समोर, आर्य समाज समोर, नानापेठ पुणे असे सांगितले.
वाचा : > कोंढव्यातील खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात,
त्याच्याकडे मिळून आलेल्या गावठी कटटयाची व जिवंत काडतुसे २० हजार १०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पठाण विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त, अशोक मोराळे,पोलिस उप-आयुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र माहिते,
पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस कर्मचारी उदय काळभोर, साहील शेख, प्रमोद टिळेकर यांनी केली आहे.
नगरसेवक गफुर पठाण यांच्या स्वनिधीतून 2 व्हेंटिलेटर

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: Deepak maratkar's murderer arrested