लवकरच होणार पुण्यातील 14 पोलीसांवर कारवाई
Police against complaint : यासंदर्भात पोलीस विभागात खळबळ व उलटसुलट चर्चा सुरू.

Police against complaint : police News 24: पुणे : पूर्वी पोलीस पाटील म्हटले की नागरिकांमध्ये एक प्रकारे आदर होतं, व तसेच त्यांचा दबदबा पण असायचा,
आता काळ बद्दलला व बघण्याचा दृष्टीकोन हि बद्दलला आहे आणि पोलीसांची कामकाजाची पद्धत हि बदललेली आहे
त्यात आर्थिक घेवाण देवाण,हितसंबंध,आर्थिक साटेलोटे, वरिष्ठांचा दबाव, राजकीय दबाव ,
काम वाढू नये यासाठी कामात हलगर्जीपणा या मुळे पोलीसांबददल असलेला आदर कमीच होत चाललेला आहे.
अनेक प्रकरणात गोरगरीब नागरिकांना न्यायापासून वंचित रहावे लागते, तर पैसे वाल्यांच्या दारात न्याय ,
अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडून मोठ्या गुन्ह्यात किरकोळ कलमे लावून न्याय विकला जातो , न्यायाचे असे आर्थिक स्वरूप झाल्याने न्याय मागावा तरी कोणाकडे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात दोषी पोलीसांविरोधात कारवाई करता याव्यात या हेतूने आदेश दिले होते,
त्या नुसार पुणे जिल्ह्यासाठी सिंहगड रोडवरील नांदेड फाटा या ठिकाणी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.
1 नोव्हेंबर 2017 ते मार्च 2019 पर्यंत पाठविलेल्या अहवालावर वरिष्ठांना कारवाई करण्यास वेळच नसल्याचे चित्र..
Advertisement92 तक्रारीतून फक्त चौदाच दोषी..
इतर बातमी : खंडणीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता
व पोलीसांविरोधात येणा-या तक्रारींना 2017 पासून तेथे घेऊन त्याचा निपटारा केला जात आहे.
1 नोव्हेंबर 2017 ते मार्च 2019 पर्यंत पाठविलेल्या अहवालावर वरिष्ठांना कारवाई करण्यास वेळच नसल्याचे चित्र..
92 तक्रारीतून फक्त चौदाच दोषी..
2017 ते मार्च 2019 पर्यंत भारती विद्यापीठ पो.ठाणे, सांगवी पो. ठाणे, येरवडा पो.ठाणेच्या 5 पोलीसांवर कारवाई करण्याचा आहवाल पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.
तर समर्थ पो. ठाणे1 , बिबवेवाडी पो. ठाणे1, खडक पो.ठाणे 1, दत्तवाडी पो.ठाणे 2 , पिंपरी पो ठाणे 3, चतुरशृंगी पो ठाणे1,डेक्कन पो ठाणे1, उत्तम नगर पो ठाणे 1,
सिंहगड पो ठाणे1 अश्या चौदा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या नावांची कारवाईसाठी शिफारस प्रधिकरणाने केली असल्याचे सजग प्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीतून समोर आले आहे,
1 नोव्हेंबर 2017 ते मार्च 2019 पर्यंत एकुण 92 तक्रारी पोलीसांविरोधात प्राप्त झाल्या तर फक्त 14 जणच दोषी आढळल्याचे प्राधिकरणाच्या पत्रव्यवहारातून सपष्ट होत आहे.
3 वर्षाचा कालावधी उलटला तरी कामचुकारपणा करणा-या पोलीसांवर कारवाईचा बडगा उगारला गेला नव्हता
या संदर्भात सजग प्रतिनिधींने पाठपुरावा केला असता लवकरच कारवाई केली जाईल असे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले आहे.
इतर बातमी : CAB & NRC विरोधात 29 डिसेंबर रोजी महामोर्चा

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: (crime of ransom news) खंडणीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता