गर्लफ्रेंन्डला इंप्रेस करण्यासाठी १५ मोबाईल फोन चोरणाऱ्या आरोपीला अटक,
भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी.
Crime branch news भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना बातमी मिळाली की, कात्रज तलाव येथे दोन इसम चोरीचे मोबाईल फोन विक्री करण्यास आले आहेत
. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज तलाव
येथे जावुन पाहीले असता त्यांना अर्जुन महादेव शेलार, वय १८ वर्षे ६ महीने, रा. मु.पो भिवरी, ता. पुरंदर, जि.पुणे, प्रेम राजु शेलार, वय २० वर्षे, रा. मु.पो भिवरी, ता.पुरंदर, जि. पुणे हे त्यांचे बॅगेमध्ये १५ मोबाईल फोनसह मिळुन आले.
त्यामोबाईल फोनबाबत आरोपीतांकडे तपास करता त्यांनी सदरचे मोबाईल फोन हे कात्रज,गोकुळनर, कोंढवा भागातुन चोरी केले असुन ते विक्री करता आलो असल्याचे सांगितले आहे.
वर नमुद आरोपीतांचे ताब्यातील मोबाईल फोनची तपासणी केली असता त्यामधील विवो कंपनीचा मोबाईल फोन हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६९७/२०२३, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले असुन आरोपीतांना नमुद्र
गुन्हयामध्ये अटक करुन त्यांचेकडुन एकुण ०२,०२,००० /- रुपये किंमतीचे १५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.
आरोपीतांचे ताब्यात मिळुन आलेल्या उर्वरीत १४ मोबाईल फोनबाबत तपास चालू आहे. आरोपीकडे केलेल्या
तपासामध्ये त्यांनी त्यांचे गर्लफ्रेंन्डला प्रत्येक वेळी वेगवेगळे मोबाईल फोन दाखवुन त्यांना इंप्रेस करण्यासाठी चोरी केले असल्याचे सांगितले आहे.