कोंढवा पोलीस व जमातेसौलेहात मदरसा तर्फे बेकरी उत्पादक संस्था यांची बैठक संपन्न.


🖕 Click Here

कोंढवा पोलीस स्टेशन , हद्दीत भाग्योदय नगर जमातेसौलेहात मदरसा कोंढवा खुर्द या ठिकाणी  10 AUGUST रोजी पुणे जिल्हा बेकरी उत्पादक सहकारी संस्था त्यांचे बैठक आयोजित करण्यात आली  होती.

सदर बैठकीच्या आयोजन कारी ईदरीस जमाते उलेमा पुणे शहराध्यक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

सदर मीटिंगमध्ये पोलीस स्टेशन तर्फे सुरू असणाऱ्या घरमालक, भाडेकरू कामगार यांची मोहिमेबद्दल असणाऱ्या अडीअडचणी व इतर समस्या यावरती चर्चा करण्यात आली.

Advertisement

बेकरी मध्ये कामाला असणार्‍या लोकांची पोलीस वेरिफिकेशन करून घेणे तसेच त्यांचे कागदपत्रे अपडेट करून आपल्याजवळ व्यवस्थित ठेवणे, बेकरीमध्ये अग्निशामक यंत्र बसवून घेणे, लाईटची सोय किंवा इमर्जन्सी तसेच कामगारांची राहण्याची सोय व्यवस्थित आहे अगर कसे याबाबत पूर्ण खात्री करून घेणे.

कोंढवा पोलिसांचा भोंगळ कारभार .

आपले असोसिएशन तर्फे जास्तीत जास्त बेकरी मालक यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती कशी गोळा करता येईल यावर उपाय योजना आखण्यात आली.

🖕 Click Here
Advertisement

प्रत्येक बेकरीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेण्यात यावे तसेच कोणत्याही बेकरीमध्ये 18 वर्षाखालील कोणीही कामगार काम करणार नाही याची खात्री करून घ्यावी.

सदर बैठकीत नागरिकांनी घरातील तसेच दुकानातील भाडेकरू करार व कामगार वेरिफिकेशन करणे गरजेचे आहे व ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले .

तसेच सदर मोहिमेस संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

सदर बैठकीत  पोलीस उपनिरीक्षक, वैभव सोनवणे पोलीस उपनिरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन, गोपनीय स्टाफ व 25 ते 30 बेकरी मालक-चालक असे उपस्थित होते. सदर बैठक सायंकाळी 19.50 वाजता सुरू होऊन 20/30 वाजता शांततेत पार पडली.

🖕 Click Here