पुण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने भरधाव कार चालवत चार जणांना चिरडले,
Retired police officer : बालेवाडीतील ममता चौकात ही घटना घडली,
Retired police officer : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
पुण्यातील बालेवाडी येथे भरधाव पणे वाहन चालवत असल्याने वाहणाचा ताबा सुटल्याने वाहन चालकाने ४ जणांना कारने ठोकर मारत चिरडल्याची घटना आज पुण्यात घडली आहे.
सदरील घटना पाहून नागरिकांचा मनस्ताप अनावर झाल्याने नागरिकांनी कार चालकाला मारहाण केली आहे.
वाचा : चोरट्यांनी चोरले 60 हजार रुपयांचे गंठण,
या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय निकम हा कार चालक निवृत्त पोलीस असल्याचे बोलले जात आहे.
बालेवाडीतील ममता चौकात ही घटना घडली. संतोष राठोड (वय ३५ रा.काळेवाडी )असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.