kondhwa murder case 2020 : ८ तासांत आरोपीला केले जेरबंद .
kondhwa murder case 2020 : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :
खून करुन पसार झालेल्या आरोपीला कोंढवा पोलीसांनी आठतासांत अटक केली आहे.
काल सकाळी ७ सुमारास ब्रम्हा अव्हेन्यु सोसायटीच्या पाण्याच्या टाकीजवळ,कोंढवा येथे एका अनोळखी इसमाचे मृत्यूदेह आढळला होता.
इसमाचा कोणत्या तरी धारदार हत्याराने भोकसून खुन केल्याचे निष्पन्न झाले. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा > गावठी कट्टा बाlळगणाऱ्या गुन्हेगाराला केले जेरबंद,
मयताची ओळख पटविण्यासाठी तपास केला असता त्याचे नाव अजय दादु खुडे,
वय-३१ वर्षे, रा लक्ष्मीमाता मंदिर ,६११,सी ई एन ९१ ,कासेवाडी भवानी पेठ पुणे असे असल्याचे पोलिसांनी सांगितले,
खुडे याचा खुन करणारा आरोपी हा जांभुळकर मळा महादेव मंदिर कॅनोलचया बाजूला वानवडी पुणे येथे लपून बसल्याची मिळालेल्या बातमी वरून पोलीस नाईक संजीव कळंबे,
यांनी तांत्रीक विश्लेषणाचे सहाय्याने प्राप्त केलेल्या माहीती वरुन वानवडी पुणे येथे सापळा लावून सिध्दार्थ ऊर्फ धुमाळ मनोज शिरसवाल वय-२८वर्षे रा. सोलापूर बाजार वानवडी पुणे यास मोठया शिताफीने ताब्यात घेतले.
सखोल तपास केला असता, त्याने मयत अजय दादू खुडे यास त्याच्या बरोबर पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून मयताचे पत्नीबरोबर प्रेम संबध असल्याची बदनामी केल्याच्या
कारणावरून चिडून मयत खुडे याचा खून केल्याची कबुली दिल्याने त्यास सदरील गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
वाचा > नगरसेवक गफुर पठाण यांच्या स्वनिधीतून 2 व्हेंटिलेटर चे वाटप.
सदर कामगिरी नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर,
सुहास बावचे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग,
विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे
सहा. पोलीस निरीक्षक चेतन मोरे, स्वराज पाटील, अनंत भोसले, अमित साळुंखे, निलेश वणवे, संजीव कळंबे,
सुशिल धिवार, ज्योतीबा पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे, किरण मोरे यांनी केली आहे.
वाचा > पुणे शहरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून,
Pingback: Arrested a criminal with a village gun