३९९ रुपयांचा मोबाईल रिचार्ज पडला ७७ हजार रुपयांत
Recharge Fraud case : ३९९ रुपयांचा रिचार्ज पडला ७७ हजार रुपयांत,

Recharge Fraud case : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी : जास्तीत जास्त पैश्यांचा व्यवहार ऑनलाईन करा असे शासनाकडून बोलले जात असले तरी आज रोजी सर्वाधिक लूट ऑनलाईन माध्यमांद्वारेच केली जात आहे.
बघता बघता थेट बॅंकैतील रक्कमच गायब होत असल्याची घटना पाहायला मिळते. नवनवीन फंडेचा वापर करून लूटणयाचा आजून एक फंडा उघडकीस आला आहे.
पर्वती दर्शन पुणे येथे राहणाऱ्या एका २८ वर्षाच्या युवकाला मोबाईल रिचार्जच्या नावाखाली ७७००० हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
अंडरवेअरवरुन भांडण:पोलीस ही चक्रावले.
हकीकत अशी की ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांनी त्यांचे मित्राचे दिनांक १९ मार्च २०२० रोजी आयडिया कंपनीचा मोबाईल नंबरवर ३९९ रुपयांचा रिचार्ज करण्यासाठी गुगल-पे द्वारे ३९९ रुपयांचा रिचार्ज केला.
रिचार्ज न झाल्याने फिर्यादी यांनी रिफंडसाठी गुगल-पे हेल्प लाईन नंबर ७७३५५२३४१० व ९१२३८६७००८ या नंबरवर कॉल केला,
त्यावर बोलणा-या अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना ‘एनि डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले,
व एनि डेस्कचा वापर करून त्यांचे एटिएम डिटेल्स व ओटीपी नंबर घेवुन फिर्यादी यांचे अकाऊंटमधुन
चार वेगवेगळे ट्रान्झेक्शन करुन एकुण ७७,०००/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली.
आपल्याला गंडा घालण्यात आल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सायबर क्राईम येथे तक्रार केली होती.
सदरील फसवणूकीचा गुन्हा अज्ञात व्यक्ती विरोधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.,
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे करत आहे.
आपत्कालीन विभाग झाले आउट ऑफ रिच:रूग्णांचे होताहेत हाल

‘Crime Branch News ’संपर्क : 9284447822
Pingback: Rangoonwala Talent Search स्कीम च्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सत्कार